हिवाळ्यात सकाळी शरीर गरम कसं ठेवावं, पद्धत घ्या जाणून

Published : Dec 24, 2025, 08:37 AM IST

हिवाळ्यात सकाळी थंडीचा सामना करण्यासाठी काही सोप्या सवयी लावा. कोमट पाणी पिणे, हलका व्यायाम करणे, उन्हात बसणे आणि गरम नाश्ता करणे यांसारख्या उपायांमुळे शरीर उबदार राहते आणि तुम्हाला दिवसभर ऊर्जावान वाटते.

PREV
17
हिवाळ्यात सकाळी शरीर गरम कस ठेवावं, पद्धत घ्या जाणून

झोपेतून उठताच थेट थंड हवेत जाऊ नका. सर्वप्रथम स्वेटर, जॅकेट किंवा शॉल घाला, विशेषतः मान, छाती आणि कान झाका. आपण आपलं अंग झाकून घेतल्यानंतर थंडी वाजण्याचा प्रमाण कमी होतं जातं.

27
कोमट पाणी प्या

सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने शरीर आतून गरम राहतं आणि थंडीचा परिणाम कमी होतो. रोज जमेल तितक्या वेळेस शक्यतो कोमटच पाणी प्यायला हवं, त्यामुळं शरीर गरम राहायला मदत होते.

37
थंड पाणी टाळा

हिवाळ्यात सकाळी थंड पाण्याने हात-पाय धुणं टाळा. शक्यतो कोमट पाणी वापरा. कोमट पाणी वापरल्यामुळं आपलं शरीर गरम राहतं आणि त्यम्मुल थंड पाण्याने येणारी कणकण येत नाही.

47
हलका व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करा

५–१० मिनिटे स्ट्रेचिंग, सूर्यनमस्कार किंवा चालणं केल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीर गरम राहतं. रोज सकाळी नियमितपणे हा व्यायाम न चुकता करायलाच हवा.

57
सकाळी उन्हात थोडा वेळ घालवा

सूर्यप्रकाशात १०–१५ मिनिटे बसल्यास शरीराला नैसर्गिक उष्णता मिळते आणि थंडी कमी जाणवते. व्हिटॅमिन डी घेतल्यामुळं आपलं शरीर तजेलदार राहायला मदत होते.

67
तेल मालिश करा

आठवड्यातून २–३ वेळा सकाळी किंवा रात्री तीळ किंवा नारळ तेलाने मालिश केल्याने शरीर उबदार राहतं. शरीर गरम राहिल्यास आपल्याला एनर्जी मिळते आणि काम करायला ताकद येते.

77
योग्य नाश्ता घ्या

सकाळी गरम नाश्ता करा. पोहे, उपमा, भाजी, सूप किंवा दूध यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थंडीचा त्रास होत नाही. आपण नियमितपणे ब्रेकफास्ट न चुकता करायलाच हवा.

Read more Photos on

Recommended Stories