How to Keep Flowers Fresh : फुलं आणल्यानंतर काही वेळातच ती कोमेजतात किंवा चिकट होतात. त्यामुळे आज आपण फ्रिज असो वा नसो, फुलं महिनाभर ताजी कशी ठेवायची याचे सोपे उपाय पाहूया..
कधीकधी फुलं स्वस्तात मिळाल्यावर आपण जास्त खरेदी करतो. फ्रिज असेल तर ठीक, पण नसेल तर काय? अनेकांना फ्रिज असूनही फुलं साठवण्याची योग्य पद्धत माहीत नसते, त्यामुळे ती लवकर खराब होतात.
26
फ्रिजमध्ये फुलं साठवण्याची पद्धत -
टिश्यू पेपर, वर्तमानपत्रात ठेवा - कोणत्याही प्रकारची फुलं आधी टिश्यू पेपरमध्ये व्यवस्थित गुंडाळा. नंतर ती वर्तमानपत्रात बांधून एका भांड्यात ठेवा. हवा खेळती राहील याची काळजी घ्या. यामुळे फुलं 15-20 दिवस ताजी राहतील.
केसात माळण्यासाठी आणलेला गजरा साठवताना लहान प्लास्टिकच्या डब्यात टिश्यू पेपर ठेवा. नंतर तो डबा फ्रिजमध्ये ठेवल्यास गजरा महिनाभर टिकू शकतो.
56
ज्यांच्याकडे फ्रिज नाही त्यांनी -
कापडी पिशवी - ज्यांच्याकडे फ्रिज नाही, त्यांनी एक कापडी पिशवी थोडी ओली करून घ्या. त्यात फुलं ठेवून, ती पिशवी एका भांड्यात घालून झाकून ठेवा. यामुळे फुलं ताजी राहतील.
66
थोडं पाणी शिंपडून भांड्यात ठेवा -
आणखी एक सोपी पद्धत आहे. फुलांवर थोडं पाणी शिंपडा आणि नंतर ती एका भांड्यात ठेवा. या पद्धतीने फुलं आठ ते दहा दिवस सहज ताजी राहतात.