Rat Killer Home Remedy: फक्त एक कारलं करेल कमाल, उंदीर, झुरळ आणि पाली कायमच्या पळतील!

vivek panmand   | CMS
Published : Sep 18, 2026, 04:40 PM IST
Rat Killer Home Remedy: फक्त एक कारलं करेल कमाल, उंदीर, झुरळ आणि पाली कायमच्या पळतील!

सार

Rat killer home remedy: घरात उंदीर, झुरळ, पाली आणि डासांचा सुळसुळाट झालाय? बाजारात मिळणारी विषारी औषधं आणायची गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरातलं एक साधं कारलं यावर जालीम उपाय आहे. कारल्याचा वापर करून या कीटकांना घरातून कायमचं कसं पळवून लावायचं? पाहा ही सोपी ट्रिक.

घरात उंदीर, झुरळ, पाली आणि डासांचा त्रास सुरू झाला की घराची शांतता भंग पावते. यांना पळवून लावण्यासाठी आपण बाजारातून जी विषारी औषधं आणतो, ती लहान मुलांसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असतात. पण, आपल्याला कडू लागणारं कारलं या कीटकांना अजिबात आवडत नाही! कारल्याच्या याच कडवटपणाचा वापर करून, कोणत्याही विषाशिवाय घर कीटकमुक्त करण्याच्या २ सोप्या पद्धती आज आपण पाहणार आहोत.

कारलं आणल्या आणल्या हे काम करा..

*एक ताजं कारलं घ्या, आतल्या बिया काढा आणि त्याचे छोटे तुकडे करा.
*पाणी न घालता मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करा.
*त्यानंतर एका गाळणीने गाळून, कारल्याचा चोथा (Pulp) आणि कारल्याचा रस (Juice) वेगवेगळा करून ठेवा.

उपाय १: उंदीर आणि झुरळांना पळवण्यासाठी 'स्पेशल गोळ्या' (Pulp Balls)

यासाठी काय लागेल?
वेगळा काढलेला कारल्याचा चोथा
किसलेला साबण (कपडे किंवा भांडी धुण्याचा) - २ चमचे
लाल तिखट - १.५ चमचा
गव्हाचं पीठ - ३ चमचे

कसं बनवायचं?

*कारल्याच्या चोथ्यामध्ये किसलेला साबण आणि लाल तिखट टाकून चांगलं मिक्स करा आणि बाजूला ठेवा.
*एका वाटीत गव्हाच्या पिठात थोडं पाणी आणि तेल टाकून चपातीच्या पिठासारखं मळून घ्या.
*या पिठाचे छोटे छोटे गोळे करा, मध्यभागी खड्डा करून त्यात आपण बनवलेलं कारलं-साबण-तिखटाचं मिश्रण भरा आणि बंद करा (मोदक किंवा लाडूसारखं वळून घ्या).
वापरण्याची पद्धत: किचन सिंकच्या खाली, गॅस शेगडीजवळ आणि घरातील कोपऱ्यांमध्ये जिथे उंदीर आणि झुरळांचा वावर जास्त असतो, तिथे या गोळ्या ठेवा.

हे कसं काम करतं?

गव्हाच्या पिठाच्या वासाने आकर्षित होऊन उंदीर-झुरळं हे खाण्यासाठी येतात. त्यांनी हे खाल्ल्यावर, आतल्या कारल्याचा कडवटपणा, तिखट आणि साबणाचा अंश त्यांच्या पचनसंस्थेला नुकसान पोहोचवतो. यामुळे त्यांना तीव्र जळजळ होते आणि ते घरातून बाहेर पळ काढतात!

(इशारा: या गोळ्या लहान मुलांच्या हाताला लागणार नाहीत याची काळजी घ्या)

उपाय २: पाली, डास आणि माशांना पळवण्यासाठी 'मॅजिक स्प्रे' (Liquid Spray)

यासाठी काय लागेल?
कारल्याचा रस (मगाशी बाजूला काढलेला)
आल्याचा रस - २ चमचे
पाणी - १ ग्लास
स्प्रे बॉटल

कसं बनवायचं?

*कारल्याच्या रसामध्ये आल्याचा रस पिळून टाका.
*यात एक ग्लास पाणी मिसळून चांगलं मिक्स करा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा.

वापरण्याची पद्धत

पालींच्या त्रासावर: भिंती, खिडक्या आणि बल्बच्या जवळ जिथे पाली फिरतात, तिथे हा लिक्विड स्प्रे मारा. याच्या उग्र आणि कडू वासाने पाली त्या जागेवर पुन्हा फिरकत नाहीत.
डास आणि माशांसाठी: संध्याकाळच्या वेळी दरवाजे आणि खिडक्यांच्या पडद्यांवर हा स्प्रे मारल्यास डास आणि माशांचा त्रास पूर्णपणे आटोक्यात येतो.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

FASTag : जुनी कार विकलीये? मग लगेच फास्टॅग बंद करा, नाहीतर बँक खातं रिकामं होईल
Petrol Diesel Prices : 11 ऑक्टोबरचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; तुमच्या शहरातील आजचा भाव काय?