हे पाहिल्यावर, 'हे खरंच घडलं होतं की AI तंत्रज्ञानाने तयार केलं आहे?' असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आजच्या काळात AI तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहे, त्यामुळे त्याचा वापर करून बनावट फोटो तयार करून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकारही वाढले.
सध्या इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels) किंवा फेसबुकवर स्क्रोल करताना, तुम्हाला काही अविश्वसनीय फोटो दिसले असतील. सेलिब्रिटी एकत्र असलेले क्षण किंवा 90 च्या दशकाच्या सुरुवातीला एखादे शहर कसे दिसत होते, असे व्हिडिओ त्यात असतात. हे पाहिल्यावर, 'हे खरंच घडलं होतं की AI तंत्रज्ञानाने तयार केलं आहे?' असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आजच्या काळात AI तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहे, त्यामुळे त्याचा वापर करून बनावट फोटो तयार करून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकारही वाढले आहेत.
25
गुगल जेमिनीचा जबरदस्त उपाय -
वापरकर्त्यांची ही चिंता समजून घेऊन, गुगलने यावर एक उत्तम उपाय आणला आहे. एखादा फोटो खरा आहे की कृत्रिमरित्या तयार केलेला (AI-generated) आहे, हे शोधण्यासाठी तुम्हाला आता थर्ड-पार्टी ॲप्सवर अवलंबून राहण्याची गरज नाही. गुगलच्या 'जेमिनी' (Gemini) द्वारे तुम्ही हे अगदी सहज ओळखू शकता. गुगल जेमिनीच्या नवीनतम आवृत्ती 'जेमिनी 3 नॅनो बनाना प्रो' (Gemini 3 Nano Banana Pro) मॉडेलमध्ये ही विशेष सुविधा जोडण्यात आली आहे.
35
SynthID: डिजिटल वॉटरमार्क तंत्रज्ञान -
AI फोटो ओळखण्यासाठी जेमिनीमध्ये 'SynthID' नावाची एक विशेष इन-बिल्ट प्रणाली आहे. हे डिजिटल वॉटरमार्कप्रमाणे काम करते. जेव्हा एखादा फोटो AI द्वारे तयार केला जातो, तेव्हा हा वॉटरमार्क त्याच्या पिक्सेलमध्ये अदृश्यपणे टाकला जातो. हे मानवी डोळ्यांना दिसत नाही, पण फोटो एडिट केला किंवा 'क्रॉप' केला तरी हा वॉटरमार्क जात नाही, हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
जेव्हा तुम्ही जेमिनीमध्ये एखादा फोटो अपलोड करून तपासता, तेव्हा ते फोटोचे पॅटर्न, लाइटिंग आणि टेक्सचर बारकाईने स्कॅन करते. सामान्यतः, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाला मानवी बोटे, दात आणि कान अचूकपणे तयार करणे थोडे कठीण जाते. उदाहरणार्थ, जास्त बोटे असणे किंवा दातांचा आकार वेगळा असणे यासारख्या चुका जेमिनी सहज ओळखते.
55
महत्वाच्या मर्यादा आणि अटी -
तुम्ही जेमिनीला 'हा AI फोटो आहे का?' असे विचारल्यास, ते लगेच त्या फोटोमध्ये 'Google AI' चे चिन्ह आहे का, हे शोधते. तसे असल्यास, तो फोटो कृत्रिमरित्या तयार केल्याची पुष्टी करते. पण, यात एक महत्त्वाची गोष्ट आहे. सध्या जेमिनी फक्त गुगलच्या स्वतःच्या AI प्रणालीचा वापर करून तयार केलेले फोटोच निश्चितपणे ओळखू शकते. ChatGPT किंवा इतर AI ॲप्सद्वारे तयार केलेले फोटो ओळखण्यात याला काही मर्यादा आहेत.