Air Quality Check : गुगल मॅपवर आजूबाजूची हवा किती प्रदूषित आहे ते कसं तपासायचं?

Published : Nov 29, 2026, 03:12 PM IST
check air quality index google maps

सार

हिवाळ्यात वाढत असलेल्या वायू प्रदूषणामुळे हवेचा दर्जा (AQI) तपासणं खूप महत्त्वाचं झालं आहे. यासाठी कोणतंही वेगळं ॲप किंवा वेबसाईटची गरज नाही, तुमच्या स्मार्टफोनमधील गुगल मॅपवर हे अगदी सहज पाहता येतं.

मुंबई : हिवाळा सुरू झाला असून वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे लांबचा प्रवास करताना हवामानाची माहिती असणं खूप गरजेचं आहे. दिल्लीसारख्या शहरांमध्ये हवा इतकी विषारी झाली आहे की श्वास घेणंही कठीण वाटतं. जसजसा हिवाळा वाढतोय, तसतसं वायू प्रदूषणाचं प्रमाणही वाढत आहे. सकाळी वॉकिंगला जाताना, ऑफिसला जाताना किंवा मुलांना शाळेत पाठवताना, आपल्या आजूबाजूची हवा किती शुद्ध आहे, याची काळजी लोकांना वाटत असते.

हे जाणून घेण्यासाठी वेगळ्या वेबसाईट किंवा ॲप्स इन्स्टॉल करण्याची अजिबात गरज नाही. तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या गुगल मॅपच्या मदतीनेच तुम्ही तुमच्या परिसराचा हवेचा दर्जा (AQI) तपासू शकता. गुगल मॅपमध्ये हे खास फीचर आहे, हे बहुतेकांना माहिती नसतं. अनेकजण यासाठी आजही टीव्हीवर अवलंबून असतात, तर काहींना वाटतं की याच्यासाठी एखादं वेगळं ॲप असावं. पण हे सगळं तुम्ही गुगल मॅपवरच पाहू शकता. गुगल मॅप फक्त रस्ताच दाखवत नाही, तर वातावरणातील बदल आणि आजूबाजूच्या हवेची शुद्धता याबद्दलही माहिती देतो.

Google Maps वर AQI कसा तपासायचा?

सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल मॅपचं नवीन व्हर्जन इन्स्टॉल करा किंवा जुनं असेल तर ते अपडेट करा आणि ओपन करा.

त्यानंतर तुम्ही गुगल मॅपवर (Google Maps) तुमचं शहर, ठिकाण किंवा जिथे जायचं आहे तिथला हवेचा दर्जा (Air Quality Index) किती आहे हे तपासू शकता.

स्टेप 1 - Google Maps ओपन करा

तुमच्या मोबाईलवर Google Maps ॲप ओपन करा. जुनं ॲप असेल तर अपडेट करा, पण त्याआधी इंटरनेट सुरू असल्याची खात्री करा.

स्टेप 2 - Layers सिलेक्ट करा

आता गुगल मॅपच्या उजव्या बाजूला असलेल्या Layers (चित्रात दाखवल्याप्रमाणे) आयकॉनवर क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसतील.

स्टेप 3 - Air Quality सिलेक्ट करा

आता स्क्रीनवर दिसणाऱ्या ऑप्शन्सपैकी Air Quality दिसलं की त्यावर क्लिक करा. क्लिक करताच, तुम्ही असलेल्या ठिकाणची माहिती आणि तिथला हवेचा दर्जा किती आहे, हे तुम्हाला दिसेल.

जर गुगल मॅपवर तुम्हाला हवेचा दर्जा दिसत नसेल, तर गुगल मॅप अपडेट करा, मोबाईलचं लोकेशन सुरू करा आणि गुगल मॅपवर तुम्ही असलेलं गाव किंवा ठिकाण सर्च करा. त्यानंतर आधी सांगितल्याप्रमाणे लेयर ऑप्शन पुन्हा दिसेल.

लक्षात घ्या: गुगल मॅपवर दाखवला जाणारा हवेचा दर्जा हा विविध सेन्सर्स, सरकारी डेटा, सॅटेलाईट आणि हवामान माहितीवर आधारित असतो, त्यामुळे अधिकृत आकडेवारीपेक्षा यात थोडा फरक असू शकतो.

सकाळी वॉकिंगला किंवा फिरायला जाण्यापूर्वी तुमच्या परिसरातील हवेचा दर्जा तपासा. जर AQI जास्त असेल तर बाहेर जाणं कमी करणं अधिक चांगलं राहील.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Post Office Scheme : 5 लाख गुंतवा, दरमहा 3083 रुपये मिळवा; पोस्टाची 5 वर्षांची जॅकपॉट योजना
Airtel Low Cost Plans : एअरटेलकडून ग्राहकांची फसवणूक? ट्रायने सांगितलेले स्वस्त प्लॅन्स कुठे गेले?