कमी पैशात हवाई प्रवास करण्यासाठी आगाऊ बुकिंग करणे, योग्य वेळ निवडणे, आणि विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वापरणे महत्त्वाचे आहे. यासोबतच, कॅशबॅक आणि बँक ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही विमान प्रवासावरील खर्च लक्षणीयरीत्या कमी करू शकता.
स्वस्तात विमान तिकीट खरेदी करून जा परदेश भ्रमंतीला, ट्रिक्स जाणून घेऊन मित्रांना करा खुश
आपल्याला एखाद्या वेळेला फ्लाईटने प्रवास करायचा असतो पण कमी पैशात कस जाता येईल याबद्दल आपल्याला माहिती नसते. अशावेळी आपण फ्लाईटचे तिकीट कसे बुक करावे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. आपण कायमच फ्लाईटने प्रवास करत असाल तर वाढणाऱ्या किंमती या आपलं बजेट सहजपणे खराब करू शकतात, त्यामुळं ही गोष्ट जाणून घेणं महत्वाचं आहे.
26
कमी पैशात हवाई प्रवास कसा करावा?
आपण कमी पैशात हवाई प्रवास कसा करता येईल त्याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत. ऑनलाईन बुकिंग प्लॅटफॉर्म, ऑफर्स आणि योग्य वेळ निवडून हवाई प्रवास खूप परवडण्याजोगा केला जाऊ शकतो. आपल्याला काही टिप्स सांगत आहोत त्या जाणून घेऊन आपण स्वस्तात प्रवास करू शकाल.
36
बुकिंग आधी करून ठेवा
आपण शेवटच्या क्षणी किंवा शेवटच्या दिवशी तिकीट बुक केल्यास ते महाग पडते. त्यामुळं तिकीट आधी बुक करून ठेवायला हवं. जर आपण महिना भर आधी तिकीट बुक केले तर ते तुम्हाला स्वस्त पडू शकते. एअरलाईन्स सुरुवातीच्या तिकीट बुकिंगवर सूट देतात.
आपण विकेंड सोडून दुसऱ्या दिवशी तिकीट बुक केल्यास ते स्वस्त पडू शकते. मंगळवार किंवा बुधवार अशा सामान्य दिवशी तिकीट खरेदी केल्यास ते २० टक्के ते ३० टक्के स्वस्त पडते. रात्री किंवा पहाटेचे तिकीट बुक केल्यास ते स्वस्त पडू शकते.
56
वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि अँप्सचा वापर करा
स्कायस्कॅनर, गुगल फ्लाइट्स, मेकमायट्रिप आणि क्लिअरट्रिप सारखे प्लॅटफॉर्म एकाच वेळी वेगवेगळ्या विमान कंपन्यांसाठी किंमती दर्शवितात. आपण यामधील सर्वात स्वस्त असणाऱ्या फ्लाईट्स निवडू शकता. त्यांच्याकडे प्राईस फिचर नावाचा पर्याय असतो, त्यामद्ये तिकीट स्वस्त झाल्यावर नोटिफिकेशन पाठवलं जात.
66
कॅशबॅकचा फायदा घ्या
आपल्याला तिकीट खरेदीवर कॅशबॅक मिळत असेल तर त्याचा नक्की फायदा घ्या. एचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँक अनेकदा एअरलाइन्स आणि ट्रॅव्हल वेबसाइट्सच्या सहकार्याने ऑफर देतात. पेटीएम आणि फोनपे सारख्या अँपच्या माध्यमातून आपल्याला ऑफर समजू शकतात.