LPG Gas Booking New Rules: केंद्र सरकारने घरगुती गॅस बुकिंगच्या नियमात बदल केला असून, आता दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम LPG गॅस वितरणावर? सरकारने बदलले बुकिंगचे नियम
LPG Gas Booking New Rules: जर तुम्ही घरगुती गॅस ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या बुकिंग नियमांमध्ये आता मोठी सुधारणा केली आहे. नवीन नियमानुसार, दोन सिलिंडर बुक करण्यामधील कालावधी आता वाढवण्यात आला आहे. साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्वांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
29
काय आहे नवीन नियम?
आता एका सिलिंडरच्या डिलिव्हरीनंतर दुसरे सिलिंडर बुक करण्यासाठी तुम्हाला किमान २५ दिवस वाट पाहावी लागेल. यापूर्वी हे अंतर २१ दिवसांचे होते. जोपर्यंत २५ दिवसांचा कालावधी पूर्ण होत नाही, तोपर्यंत गॅस कंपन्यांचे सॉफ्टवेअर तुमचे नवीन बुकिंग स्वीकारणार नाही.
39
नियम बदलण्याचे मुख्य कारण
पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, अनेक ग्राहक भीतीपोटी गरजेपेक्षा जास्त गॅस साठवून ठेवत असल्याचे समोर आले आहे. ही अनावश्यक साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.