Saving Investment Tips : १ कोटी कसे जमा कराल? दर महिन्याच्या गुंतवणुकीतून तयार होईल फंड

Published : Jul 07, 2026, 08:40 PM IST
Saving Money

सार

Crores of Investment : अनेकांना करोडपती होयचं असतं, पण त्यासाठी पैसे कसे जमवायचे, कुठे गुंतवणूक करायची, कशी करायची याबाबत माहिती नसते. महत्त्वाची बाब म्हणजे १ कोटी इतकी रक्कम जमा करण्यासाठी सातत्य, गुंतवणूक शिस्तीने करणं महत्त्वाचं ठरतं. 

मुंबई : अनेकांचं करोडपती होण्याचं, मोठं घर घेण्याचं स्वप्न असतं. पण इतके पैसे कसे जमा होणार याची मात्र माहिती नसते. १ कोटींची इतकी मोठी रक्कम जमा करण्यासाठी सातत्याने गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं.

१ कोटींचा फंड

१ कोटींचा फंड जमा करायचा असेल, तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात SIP करणं फायद्याचं ठरतं. म्युच्युअल फंडद्वारे एसआयपीमध्ये गुंतवणूक करता येते.

दर महिन्याला SIP

दरवर्षी उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे एसआयपी गुंतवणुकही दरवर्षी वाढवणं फायद्याचं ठरतं. १ कोटींचा निधी जमा करण्यासाठी स्टेट-अप एसआयपी केल्यास त्याचा फायदा होतो. अशी स्टेट-अप गुंतवणूक केल्यावर त्यात चक्रवाढ व्याजचा अर्थात कम्पॉन्डिंगचा फायदा मिळतो.

१० हजारांची गुंतवणूक

एखाद्या गुंतवणूकदाराने SIP द्वारे महिन्याला १० हजार रुपयांची गुंतवणूक केली तर त्यावर वर्षाला १२ टक्के रिटर्न्स मिळतात. या हिशोबाने १ कोटींचा फंड तयार करण्यासाठी २१ वर्ष लागतील.

२१ वर्षात १ कोटींचा फंड

२१ वर्षात २५.२० लाख रुपये एकूण गुंतवणूक केली जाते. त्यावर तब्बल ७९.१० लाख रुपये व्याज मिळतं. त्यामुळे २१ वर्षात मूळ मुद्दल एकूण गुंतवणूक आणि त्यावर व्याज असं मिळून एकूण गुंतवणूक अंदाजे १.४ लाख इतकी असेल.

१८ वर्षात १ कोटींचा फंड

जर गुंतवणुकदाराने SIP ची महिन्याला रक्कम १५ हजार रुपये केली, तर १ कोटीचा फंड तयार होण्यासाठी १८ वर्षांचा काळ लागेल. १८ वर्षांनी १.६ कोटींचा फंड तयार असेल.

स्टेप-अप SIP चा फायदा

जर एखाद्याने १० हजार रुपये महिन्याला गुंतवणूक केली आणि दरवर्षी त्या १० हजारांच्या रकमेत १० टक्क्यांची वाढ केली, तर १२ टक्क्यांच्या रिटर्न्सच्या हिशोबाने १७ वर्षात १ कोटींचा फंड जमा होईल. १७ वर्षात १.१५ कोटींचा फंड तयार होईल.

दरवर्षी SIP मध्ये १५ टक्क्यांची वाढ

जर महिन्याच्या १० हजारांच्या SIP मध्ये दरवर्षी १५ टक्क्यांची वाढ केली तर १ कोटींचा फंड तयार करण्यासाठी केवळ १५ वर्षांचा काळ लागेल. यातून १५ वर्षात १.१३ कोटी जमा होतील.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Office Jewellery : ऑफिसमध्ये सर्वच म्हणतील, वा..व फक्त 500 रुपये, किती सुंदर
Small Room Decor: लहान खोली मोठी आणि आलिशान कशी दाखवायची? 10 भन्नाट आयडिया