शारीरिक संबंधांबद्दल लोकांचा काय विचार आहे हे जाणून घेण्यासाठी, 18 ते 49 वयोगटातील लोकांवर एक संशोधन करण्यात आले. या संशोधनात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. संशोधनाच्या अहवालानुसार, 18-29 वयोगटातील लोक वर्षातून सरासरी 112 वेळा लैंगिक संबंध ठेवतात. 'किन्से इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन सेक्स, रिप्रोडक्शन अँड जेंडर'ने केलेल्या या संशोधनानुसार, 30 ते 39 वयोगटातील लोक वर्षातून सरासरी 86 वेळा, तर 40 ते 49 वयोगटातील लोक 69 वेळा लैंगिक संबंध ठेवतात. या जोडप्यांपैकी 45 टक्के जोडपी महिन्यातून फक्त काही दिवसच लैंगिक संबंध ठेवत होते. यासोबतच, 13 टक्के लोकांनी मान्य केले की लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांचे लैंगिक जीवन कमी झाले.