HMPV चाचण्यांसाठी किती खर्च लागतो? लॅब फीबद्दल जाणुन घ्या!

भारतात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) चे सात रुग्ण आढळले आहेत, ज्यामुळे या श्वसनविकारजन्य विषाणूचा प्रसार लक्षवेधी ठरत आहे. HMPV चे निदान करण्यासाठीच्या चाचणीसाठी किती खर्च येतो याची माहिती घेऊया.

मंगळवारी भारतात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) चे दोन नवीन रुग्ण आढळले, ज्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या सात झाली आहे. अलीकडील हे रुग्ण नागपूरमध्ये सापडले असून, याआधीच्या दिवशी बंगळुरूमध्ये दोन आणि अहमदाबाद, चेन्नई व सलेम येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला होता. यामुळे या श्वसनविकारजन्य विषाणूचा देशभर होणारा प्रसार लक्षवेधी ठरत आहे.

पुरेशी विश्रांती व शरीराला हायड्रेट ठेवल्याने विषाणू होतो बरा 

HMPV हा एक सामान्य श्वसनविकारजन्य विषाणू आहे, जो प्रामुख्याने सौम्य लक्षणे निर्माण करतो. यात ताप, खोकला, घशात खवखव आणि नाक बंद होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. बहुतेक निरोगी व्यक्तींमध्ये पुरेशी विश्रांती व शरीराला हायड्रेट ठेवण्याच्या उपायांनी हा विषाणू बरा होतो. मात्र, लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि कमजोर प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये हा विषाणू गंभीर गुंतागुंती निर्माण करू शकतो.

आणखी वाचा-  HMPV विषाणूचा वाढता प्रसार: काय आहेत धोके?, जाणून घ्या संपूर्ण माहिती

HMPV च्या चाचणीसाठी किती खर्च लागतो?

HMPV चे निदान करण्यासाठी बायोफायर पॅनेल साराख्या प्रगत निदान पद्धतींची आवश्यकता असते. ज्याद्वारे एका चाचणीत अनेक जिवाणू व विषाणू ओळखता येतात, त्यात HMPV चाही समावेश आहे. भारतातील काही खाजगी प्रयोगशाळांमध्ये ही चाचणी उपलब्ध आहे, परंतु त्याचा खर्च लक्षणीय असतो. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस RT-PCR चाचणीचा खर्च डॉ. लाल पाथ लॅब्स, टाटा 1mg लॅब्स आणि मॅक्स हेल्थकेअर लॅब यांसारख्या प्रमुख प्रयोगशाळांमध्ये साधारणपणे ३००० ते ८,००० रुपयां दरम्यान असतो.

HMPV, अ‍ॅडेनोव्हायरस, कोरोना व्हायरस 229E आणि कोरोना व्हायरस HKU1 यांचा समावेश असलेल्या अधिक व्यापक चाचणीसाठी खर्च २०,००० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. चाचणीसाठी नमुना प्रकारामध्ये नासोफॅरिंजियल स्वॅब्स, थुंकी, ब्रॉन्कोअल्व्होलर लॅवेज (BAL) किंवा ट्रॅशियल एस्पिरेट यांचा समावेश असतो.

प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांसाठी हा विषाणू अधिक गंभीर

सामान्यत: निरोगी व्यक्तींमध्ये HMPV सौम्य लक्षणे निर्माण करतो, जसे की घशात खवखव, नाक बंद होणे, खोकला, आणि सौम्य ताप. मात्र, लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि कमजोर प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी हा विषाणू अधिक गंभीर ठरू शकतो. लहान मुलांमध्ये लक्षणे अधिक तीव्र स्वरूपाची होऊ शकतात, ज्यात उच्च पिच असलेले श्वास घेणे, जलद श्वासोच्छवास, श्वास घेताना छातीच्या स्नायूंचा स्पष्ट वापर दिसून येणे. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये सायनोसिस होऊ शकतो, ज्यामध्ये ओठ किंवा बोटांना निळसर रंग येतो. अशा लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

आणखी वाचा- मुंबईत एचएमपीव्ही बाधा; सहा महिन्यांच्या मुलीला रुग्णालयातून सोडण्यात आले

HMPV साठी कोणतेही विशिष्ट औषधोपचार नाहीत

सध्या HMPV साठी कोणत्याही विशिष्ट अँटीव्हायरल औषधोपचार उपलब्ध नाहीत. सौम्य लक्षणे असलेल्या बहुतेक रुग्णांना घरीच विश्रांती आणि शरीर हायड्रेट ठेवून उपचार करता येतात. मात्र, लक्षणे अधिक तीव्र झाल्यास गुंतागुंती टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता भासू शकते.

संभाव्य उपचार:

1. ऑक्सिजन थेरपी: श्वासोच्छवास सुलभ करण्यासाठी नाकातून ट्यूब किंवा मास्कद्वारे पूरक ऑक्सिजन दिला जाऊ शकतो.

2. इंट्राव्हेनस फ्लूइड्स: शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून सलाईनमार्गे (IV) द्रव दिले जातात.

3. कॉर्टिकोस्टिरॉइड्स: श्वसनसंस्थेतील जळजळ कमी करण्यासाठी आणि लक्षणे कमी करण्यासाठी स्टिरॉइड्स दिले जाऊ शकतात.

रुग्णांच्या स्थितीनुसार डॉक्टर योग्य उपचार पद्धती ठरवतात, त्यामुळे तीव्र लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

Share this article