Honda Stops Electric Scooter Production : होंडा सारख्या जागतिक ब्रांडवर मोठी नामुष्की ओढवली आहे. Activa e आणि QC1 या इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन ऑगस्टपासून थांबवावे लागले आहे. कमी किमतीच्या QC1 मॉडेलची विक्री Activa e पेक्षा जास्त आहे.
होंडाने भारतात आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक दुचाकी, Honda Activa e आणि Honda QC1, या वर्षाच्या सुरुवातीला लाँच केल्या. जपानचा ब्रँड असल्याने चांगला प्रतिसाद अपेक्षित होता. पण माहितीनुसार, ऑगस्ट 2025 पासून उत्पादन थांबले आहे.
24
Activa e विक्री
फेब्रुवारी ते जुलै 2025 पर्यंत होंडाने 11,168 युनिट्स तयार केले, पण फक्त 5,201 डीलर्सना पाठवले. यापैकी 4,461 युनिट्स QC1 चे आहेत, ज्याची विक्री Activa e पेक्षा जास्त आहे. कमी किंमत हे याचे कारण आहे.
34
किंमतीची तुलना
होंडा Activa e: 1.17 लाख, रेंज: 102 किमी. Honda QC1: 90,022, रेंज: 80 किमी. कमी किंमत आणि सोप्या वापरामुळे QC1 अधिक लोकप्रिय आहे. TVS, Bajaj, Ola सारख्या ब्रँड्सची स्पर्धा हेही एक कारण आहे.
QC1 सध्या मुंबई, दिल्लीसह 6 शहरांमध्ये उपलब्ध आहे, तर Activa e खूप कमी शहरांमध्ये मिळते. देशभरात उपलब्ध नसल्याने विक्री कमी आहे. भविष्यात होंडा उत्पादन पुन्हा सुरू करेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.