होंडाने भारतीय बाजारात आपली नवीन QC3 इलेक्ट्रिक स्कूटर आणली आहे. ही स्कूटर एका पूर्ण चार्जमध्ये १५१ किमीची रेंज देते. यात ३२ लीटरचा मोठा अंडर-सीट स्टोरेज आणि स्मार्ट की सिस्टीमसारखे आधुनिक फीचर्स आहेत.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक आता चांगल्या मायलेजच्या आणि बजेटमध्ये बसणाऱ्या गाड्या घेत आहेत. आता होंडा कंपनीने भारतीय बाजारात आपली नवी QC3 इलेक्ट्रिक स्कूटर आणली आहे.
25
एका चार्जमध्ये १५१ किमी रेंज
कंपनीने ही स्कूटर खास शहरात राहणाऱ्या, रोज ऑफिस-कॉलेजला जाणाऱ्यांसाठी बनवली आहे. ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर १५१ किमीची IDC रेंज देते. त्यामुळे वारंवार चार्जिंग करण्याचं टेन्शन राहणार नाही, असं होंडाचं म्हणणं आहे.
35
बॅटरी आणि चार्जिंगची वेळ
Honda QC3 मध्ये 3kWh ची फिक्स्ड लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. जे लोक रोज ३० ते ४० किमीचा प्रवास करतात, त्यांच्यासाठी ही स्कूटर एक उत्तम पर्याय असेल, असं कंपनीचं म्हणणं आहे. ही बॅटरी शून्य ते ८० टक्के चार्ज होण्यासाठी २ तास ४० मिनिटं घेते, तर पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात.
Honda QC3 चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात दिलेला ३२ लीटरचा मोठा अंडर-सीट स्टोरेज. या जागेत तुम्ही हेल्मेट, बॅग आणि इतर गरजेच्या वस्तू आरामात ठेवू शकता. त्यामुळे तुम्ही नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर हा एक चांगला पर्याय आहे.
55
किंमत आणि आधुनिक फीचर्स
Honda QC3 मध्ये स्मार्ट की सिस्टीमसारखे मॉडर्न फीचर्स आहेत. यात ५ इंचाचा TFT डिस्प्ले दिला आहे, जो कनेक्टेड फीचर्स आणि नेव्हिगेशनला सपोर्ट करतो. यामुळे रायडरला एक उत्तम अनुभव मिळतो. या QC3 इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १,२०,००० रुपये आहे. याच वर्षी डिसेंबरपासून ही स्कूटर ग्राहकांना मिळेल.