तुमच्या चेहऱ्यावर जास्त मुरूम येत असतील तर खाली दिलेले फेसपॅक वापरून पाहा. यामुळे मुरुम तर जातीलच पण चेहऱ्यालाही नैसर्गिंक ग्लो येईल. नैसर्गिकपणे चेहरा चमकेल. मुरुम पुन्हा येणार नाहीत. साईड इफेक्टही राहणार नाहीत.
चेहऱ्यावर खूप मुरूम येतात का? त्यावर उपाय म्हणून अनेक क्रीम्स आणि उपचार करूनही मुरूम कमी होत नाहीत? मग घरच्या घरी स्वयंपाकघरातील काही साहित्यांपासून बनवलेले फेसपॅक वापरून पहा. यामुळे मुरूम कमी होतील आणि चेहराही उजळेल. कोणते फेसपॅक वापरायचे ते पाहूया.
26
कोरफड आणि ग्रीन टी फेसपॅक
२ चमचे कोरफडीच्या जेलमध्ये थोडी ग्रीन टी मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. रात्री झोपण्यापूर्वी लावा. मुरूम कमी होतील आणि त्वचा मऊ होईल.
36
मध आणि पपई फेसपॅक
पिकलेली पपई चोळून त्यात थोडं मध मिसळा. चेहरा आणि मानेवर लावा आणि १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. नंतर मॉइश्चरायझर लावा.
पिकलेली केळी चोळून त्यात हळद आणि थोडे गुलाबपाणी किंवा मध मिसळा. चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. नंतर मॉइश्चरायझर लावा.
56
मुल्तानी माती आणि कडुलिंब फेसपॅक
कडुलिंबाची पूड आणि मुल्तानी मातीत थोडे गुलाबपाणी मिसळून पेस्ट करा. चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. नंतर मॉइश्चरायझर लावा.
66
मध आणि ओट्स फेसपॅक
२ चमचे ओट्स घेऊन पिठ तयार करा. पिठात १ चमचा मध मिसळा. चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. हवे असल्यास ग्रीन टी किंवा कोमट पाणी मिसळू शकता.