Summer Dessert केवळ १० मिनिटांत बनवा मँगो आईस्क्रीम! थोडाही शिल्लक राहणार नाही

Published : May 16, 2025, 01:23 PM IST

आपल्याला आवडणारे पिकलेले हापूस आंबे वापरून घरच्या घरीच स्वादिष्ट मँगो आईस्क्रीम बनवा! ही सोपी रेसिपी वापरून तुम्ही उन्हाळ्यात थंडगार आनंद घेऊ शकता.

PREV
16
साहित्य

पिकलेला हापूस/रसाळ आंबा – 2 मध्यम, कंडेन्स्ड मिल्क– ½ कप, फ्रेश क्रीम– 1 कप, साखर – 2-3 टेबलस्पून, व्हॅनिला इसेन्स – ½ टीस्पून (ऐच्छिक)

26
आंब्याचा गर पल्पमध्ये तयार करा

आंब्याचा गर मिक्सरमध्ये घालून त्याचा गुळगुळीत पल्प तयार करा. दुसऱ्या भांड्यात फ्रेश क्रीम घ्या आणि त्याला हलक्या हाताने फेटा.

36
पल्प एकत्र करून घ्या

त्यात हळूहळू कंडेन्स्ड मिल्क, साखर, मँगो पल्प आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा. हे मिश्रण एकसंध झाल्यावर एअरटाइट डब्यात ओता.

46
स्कुप सर्व्ह करून घ्या

झाकण लावून 6-8 तास फ्रिझरमध्ये फ्रीज करा. एकदा सेट झालं की थोडं बाहेर काढून ठेवा आणि मग स्कूप करून सर्व्ह करा!

56
टिप्स

अधिक क्रीमी टेक्स्चर हवं असल्यास व्हिपिंग क्रीम वापरा. ड्राय फ्रूट्स, चॉकलेट चिप्स किंवा मँगो क्युब्स टॉपिंग म्हणून घालू शकता. साखरेचा अंदाज नेहमी पल्प चवून घ्या – काही आंबे फार गोड असतात.

66
ही आईसक्रीम कुठे खास लागते?
  • उन्हाळ्याच्या संध्याकाळी
  • जेवणानंतर स्वीट डिश म्हणून
  • वाढदिवस/पार्टीत घरच्या घरी सरप्राईज देण्यासाठी

Recommended Stories