Home Safety: 'ही' 5 उपकरणं पॉवर स्ट्रिपवर कधीच लावू नका, निर्माण होईल धोका

Published : May 12, 2026, 09:00 PM IST

Home Safety: एकाच वेळी अनेक उपकरणं चालवण्यासाठी आपण पॉवर स्ट्रिप वापरतो. यामुळे काम सोपं होतं खरं, पण जास्त वीज लागणारी उपकरणं त्यावर चालवणं धोकादायक ठरू शकतं. जाणून घेऊया कोणती आहेत ही उपकरणं.

PREV
15
एअर कंडिशनर
एअर कंडिशनर चालवण्यासाठी खूप जास्त वीज लागते. त्यामुळे ते पॉवर स्ट्रिपवर लावल्यास उपकरण जास्त गरम होऊ शकतं आणि त्यात बिघाड होण्याची शक्यता वाढते.
25
रेफ्रिजरेटर
रेफ्रिजरेटर कधीही पॉवर स्ट्रिपवर वापरू नये. कारण इतर उपकरणांच्या तुलनेत याला जास्त विजेची गरज असते आणि ते सतत चालू राहते.
35
सौंदर्यवर्धक उपकरणं
हेअर ड्रायर, कर्लिंग आयर्न किंवा स्ट्रेटनरसारखी सौंदर्य उपकरणं जास्त वीज खेचतात. यांना पॉवर स्ट्रिपवर चालवणं सुरक्षित नाही, यामुळे अपघात होऊ शकतो.
45
मायक्रोवेव्ह
मायक्रोवेव्ह चालवण्यासाठीही जास्त पॉवर लागते. जर तुम्ही ते पॉवर स्ट्रिपवर लावून वापरलं, तर आग लागण्याचा धोका वाढतो.
55
स्वयंपाकघरातील छोटी उपकरणं
टोस्टर, कॉफी मेकर यांसारखी स्वयंपाकघरातील छोटी उपकरणंही पॉवर स्ट्रिपवर चालवणं सुरक्षित नाही. ही उपकरणं कमी वेळेसाठी चालत असली तरी जास्त वीज वापरतात.
Read more Photos on

Recommended Stories