कमी किंमत, जास्त मायलेज आणि विश्वासार्ह कामगिरीमुळे ही बाईक भारतात सर्वाधिक विकली जाणारी मोटरसायकल बनली आहे. ही बाईक सुमारे 70 kmpl मायलेज आणि ₹74,000 च्या सुरुवातीच्या किंमतीसह येते.
Hero कंपनीच्या Splendor Plus बाईकने भारतात पुन्हा एकदा आपण 'मास हिट' असल्याचं सिद्ध केलं आहे. डिसेंबर 2025 मध्ये ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी मोटरसायकल ठरली आहे. त्याच महिन्यात सुमारे 2.8 लाखांहून अधिक लोकांनी ही बाईक खरेदी केली आहे. दररोज सरासरी 9,000 लोक स्प्लेंडर प्लस खरेदी करतात, यावरून तिची प्रचंड लोकप्रियता दिसून येते.
25
Hero Splendor Plus ची विक्री
या बाईकच्या मोठ्या विक्रीमागे कमी किंमत, जास्त मायलेज आणि विश्वासार्ह कामगिरी ही तीन प्रमुख कारणं आहेत. भारतात केवळ शहरातच नाही, तर ग्रामीण भागातही अनेक वर्षांपासून ही एक विश्वासू बाईक म्हणून ओळखली जाते. रोजच्या प्रवासासाठी कमी खर्चात चांगला पर्याय असल्यामुळे अनेकजण तिला पसंती देतात.
35
Splendor Plus ची किंमत ₹74,000
Hero Splendor Plus ची सुरुवातीची किंमत सुमारे ₹74,000 (एक्स-शोरूम) आहे. ही बाईक विविध व्हेरिएंट्स आणि अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असल्यामुळे, विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार लोकांपर्यंत सर्वांसाठी योग्य आहे. किंमत कमी असली तरी, वापरासाठी आवश्यक फीचर्स पुरेशा प्रमाणात दिले आहेत.
या बाईकमध्ये 97.2cc एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. हे सुमारे 8PS पॉवर आणि 8Nm पेक्षा जास्त टॉर्क निर्माण करते. यात Hero ची i3S टेक्नॉलॉजी असल्यामुळे, सिग्नलवर थांबल्यावर इंजिन आपोआप बंद होते आणि क्लच दाबल्यावर पुन्हा सुरू होते. यामुळे पेट्रोलची अधिक बचत होते.
55
70 किमी मायलेज देणारी बाईक
Splendor Plus मुख्यत्वे तिच्या मायलेजमुळे ओळखली जाते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक सुमारे 70 kmpl पर्यंत मायलेज देते. या बाईकच्या 9.8-लीटर पेट्रोल टाकीमुळे, एकदा टाकी फुल्ल केल्यावर सुमारे 700 किमी पर्यंतचा प्रवास करता येतो. यात अॅनालॉग मीटर, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ, ट्यूबलेस टायर्स यांसारख्या बेसिक फीचर्ससह XTEC व्हेरिएंटमध्ये LED हेडलाइट, डिजिटल डिस्प्ले, ब्लूटूथ यांसारख्या सुविधा आहेत.