वांगी आहेत आरोग्यदायी, पण या लोकांनी ती खाणे का टाळावे? जाणून घ्या महत्त्वाची कारणे

Published : Dec 19, 2025, 02:55 AM IST
brinjal side effects

सार

वांगी ही एक पौष्टिक भाजी असून तिचे हृदय, रक्तातील साखर आणि वजन नियंत्रणासाठी अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी वांगी खाणे टाळावे. कोणत्या व्यक्तींनी आणि कधी वांगी खाणे टाळावे, ते पाहूया… 

वांगी ही अनेकांच्या आवडत्या भाज्यांपैकी एक आहे. वांग्याचे भरीत, भाजी सर्वांनाच आवडते.  वांग्यामध्ये (Brinjal) अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. हिवाळ्यात वांगी जास्त प्रमाणात खावीत असे म्हटले जाते. वांग्याच्या सेवनाने हृदयाच्या आजारांचा (Heart Disease) धोका टळतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वांगी फायदेशीर आहेत. परंतु वांगी खाण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. 

वांग्यांची भाजी सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध असते. त्याची किंमतही बऱ्यापैकी कमी असते आणि चवही उत्तम असते. वांग्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवता येतात. वांग्याचे भरीत, भाजी सर्वांनाच आवडते. काही लोकांना त्यातील लहान बियांमुळे ते खायला आवडत नाही. वांग्यामध्ये (Brinjal) अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. हिवाळ्यात वांगी जास्त प्रमाणात खावीत असे म्हटले जाते. वांग्याच्या सेवनाने हृदयाच्या आजारांचा (Heart Disease) धोका टळतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वांगी फायदेशीर आहेत. जर तुम्ही वजन (Weight) कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या डाएट प्लॅनमध्ये वांग्याचा समावेश करू शकता. कर्करोग नियंत्रण, त्वचेचे आरोग्य यासह वांगी खाण्याचे अनेक फायदे आहेत. 

वांगी अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त आहेत. हे वेदनाशामक म्हणून काम करते. वांग्यामध्ये अँटी-अस्थमा क्षमता देखील आहे.  पण प्रत्येकजण याचे सेवन करू शकत नाही. काही लोकांनी वांग्यापासून दूर राहिलेलेच बरे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणी वांगी खाऊ नयेत.

वांगी कोणी खाऊ नयेत, माहित आहे का? : 

गॅस – पोटाच्या समस्या वाढवते वांगी : तुम्हाला गॅसची समस्या असेल किंवा पोट फुगणे, पोटदुखी यांसारख्या समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल, तर वांगी न खाणेच चांगले. यामुळे तुमची गॅसची समस्या आणखी वाढू शकते.

ॲलर्जी असणाऱ्यांनी खाऊ नका : जर तुम्हाला त्वचेची ॲलर्जी असेल, तर तुम्ही वांगी खाणे टाळावे. वांग्यामुळे तुमची त्वचेची ॲलर्जी वाढू शकते. यामुळे तुम्हाला अधिक त्रास सहन करावा लागू शकतो. 

नैराश्य वाढवते : जर तुम्ही नैराश्याने ग्रस्त असाल आणि त्यासाठी औषधे घेत असाल, तर वांगी खाण्याच्या फंदात पडू नका. वांगी तुमच्या औषधांचा प्रभाव कमी करू शकतात. जर तुम्ही नैराश्य कमी करण्यासाठी औषध घेत असाल आणि सोबत वांगी खात असाल, तर नैराश्य कमी होण्याऐवजी वाढण्याचा धोका असतो. 

ॲनिमिया : ॲनिमियाच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनीही वांगी खाऊ नयेत. वांगी रक्त तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतात. 

डोळ्यांची जळजळ : जर तुमच्या डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल किंवा डोळे सुजले असतील, तर तुम्ही वांगी खाऊ नका. यामुळे समस्या वाढण्याचा धोका असतो. 

मूळव्याध : जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास होत असेल, तर तुम्ही वांग्याचे सेवन करणे टाळा. वांग्यामध्ये तुमचा मूळव्याधाचा त्रास वाढवण्याचा गुणधर्म असतो.

किडनी स्टोन : जर तुमच्या किडनीमध्ये किंवा शरीराच्या कोणत्याही भागात स्टोन (खडे) असल्याचे निदान झाले असेल, तर तुम्ही वांगी खाऊ नका. वांग्यामध्ये ऑक्सलेट असते, जे स्टोन विरघळू देत नाही.

वांगी कधी खाऊ नयेत : जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या नसेल, तर तुम्ही आरामात वांगी खाऊ शकता. पण शक्यतो जून ते ऑगस्ट महिन्यात वांगी खाणे टाळा. कारण या काळात जास्त पाऊस पडत असल्याने वांग्यांमध्ये किडे असण्याची शक्यता जास्त असते. 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

विवो कंपनीचा प्रीमियम फोन येणार मार्केटमध्ये, स्पेसिफिकेशन पाहून पडाल प्रेमात
चेहऱ्यावर काळे डाग आहेत? मग कोरफड वापरून करा पॅक तयार