
Health Tips : हिवाळ्यात आपली त्वचा खूपच कोरडी होते. प्रामुख्याने चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी विविध प्रकारचे क्रीम आणि लोशन बाजारात उपलब्ध आहेत. यातील बहुतांश क्रीम आणि लोशनमध्ये रासायनिक पदार्थ असतात. त्यामुळे त्याची आधी चाचणी करून घेणे आवश्यक ठरते, अन्यथा त्याचे त्वचेवर दुष्परिणाम होतात. पण घरच्या उपायांनी चेहरा तजेलदार ठेवता येतो. विशेषत:, याचा उपयोग केवळ थंडीतच नव्हे तर, वर्षाचे बारा महिने करता येतो.
सौंदर्य संरक्षणासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांपेक्षा दूध अधिक प्रभावी आहे. त्वचेवरील घाण काढून नैसर्गिक चमक देण्यास ते मदत करते.
दुधामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास आणि रंग उजळ करण्यास मदत करते. याशिवाय, त्यातील व्हिटॅमिन ए, डी, आणि ई त्वचेला आवश्यक पोषण देतात.
चेहऱ्यावरील घाण आणि तेलकटपणा दूर करण्यासाठी दुधाचा खालीलप्रमाणे वापर करता येतो:
कच्चे दूध एका लहान भांड्यात घ्या. ते थंड असेल तर अधिक चांगले. कापसाचा बोळा दुधात बुडवून चेहरा आणि मानेवर हळूवारपणे लावा. पाच मिनिटे बोटांनी गोलाकार मसाज करा. यामुळे त्वचेची छिद्रे उघडण्यास आणि घाण बाहेर काढण्यास मदत होते. 10-15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा.
दुधामध्ये इतर काही नैसर्गिक घटक मिसळल्यास परिणाम दुप्पट होतो:
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी दूध वापरताना काळजी घ्यावी. दूध लावल्यानंतर चेहऱ्यावर मुरुमे येत असल्यास वापर टाळावा किंवा दुधात थोडा लिंबाचा रस मिसळून वापरावा. रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा बाहेरून आल्यानंतर दुधाने चेहरा स्वच्छ करण्याची सवय लावल्यास त्वचेची नैसर्गिक चमक टिकून राहते.