Aluminium Utensils : ॲल्युमिनियमची भांडी वजनाला हलकी आणि स्वस्त असतात. त्यामुळे बहुतेक घरांमध्ये ॲल्युमिनियमची भांडी जास्त दिसतात. पण खरं तर, यामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता जास्त असते.
ॲल्युमिनियमची भांडी वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ही भांडी हलकी, स्वस्त आणि स्वच्छ करायला सोपी असतात. पण यात शिजवलेले अन्न खाल्ल्याने गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात.
24
ॲल्युमिनियम म्हणजे काय?
ॲल्युमिनियम हा भांड्यांमध्ये वापरला जाणारा हलका धातू आहे. तो लवकर गरम होतो. पण आंबट पदार्थ शिजवताना, ॲल्युमिनियमचे कण अन्नात मिसळून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
34
या समस्या उद्भवू शकतात
ॲल्युमिनियमच्या भांड्यांच्या वापरामुळे मेंदूचे आजार (अल्झायमर), किडनीचे नुकसान आणि हाडे कमकुवत होण्याचा धोका असतो. यामुळे गॅस आणि पोटाच्या समस्याही वाढू शकतात.
स्टेनलेस स्टील, कास्ट आयर्न (बीड) आणि मातीची भांडी वापरणे आरोग्यासाठी उत्तम आहे. ॲल्युमिनियमची भांडी वापरल्यास त्यात आंबट पदार्थ शिजवू नका किंवा अन्न साठवू नका.