आपल्या स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले असतात. त्यांचा आपण स्वयंपाकात वापर करतो. पण त्या मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्मही असतात. हे मसाले आपल्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. पचनक्रिया सुधारतात, वजन कमी करतात, अनिद्रा कमी करतात, मासिक पाळीच्या समस्याही कमी करतात. असे अनेक फायदे देणार्या मसाल्यांमध्ये बिर्याणी मसाला जावित्री अग्रेसर आहे. नियमितपणे जावित्री पाण्यात उकळून ते पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊया.