Credit Card : फक्त 46 पैशांसाठी 1200 रुपयांचा भुर्दंड! HDFC बँकेच्या अजब कारभाराने ग्राहक हैराण

Published : Aug 19, 2026, 01:42 PM IST
Credit Card : फक्त 46 पैशांसाठी 1200 रुपयांचा भुर्दंड! HDFC बँकेच्या अजब कारभाराने ग्राहक हैराण

सार

HDFC बँकेने एका ग्राहकाला क्रेडिट कार्ड बिलात फक्त 46 पैसे कमी भरल्यामुळे 1200 रुपयांपेक्षा जास्त लेट फी लावली आहे. डॉक्टर समीर कागळकर यांनी हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केल्यावर तो व्हायरल झाला. यासोबतच RBI चे नियम काय सांगतात तेही जाणून घेऊया.

नवी दिल्ली : क्रेडिट कार्डचं बिल भरताना फक्त 46 पैसे कमी पडले, म्हणून HDFC बँकेने एका ग्राहकाला तब्बल 1,200 रुपयांपेक्षा जास्त लेट पेमेंट चार्ज लावला आहे. 10,649.46 रुपयांच्या बिलापैकी 10,649 रुपये भरले, पण 46 पैसे भरायचे राहून गेल्याने ग्राहक डॉक्टर समीर कागळकर यांना हा मोठा भुर्दंड सहन करावा लागला. समीर यांनी बँकेला टॅग करत हा सगळा प्रकार 'X' वर शेअर केला.

राहिलेल्या पैशांच्या 2600 पटीने अधिक दंड घेतला

थकबाकीच्या रकमेच्या म्हणजेच फक्त ४६ पैशांच्या 2,600 पटींपेक्षा जास्त दंड बँकेने वसूल केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ही बाब सांगितली आहे. 46 पैसे न भरण्याची ही छोटीशी चूक अनवधानाने झाली असून, बँकेने लावलेले शुल्क त्वरित रद्द करावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

RBI चा याबाबत नियम काय?

अशा प्रकरणांमध्ये बँकांनी दंड कसा लावावा, याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) काही नियम आहेत. RBI च्या नियमांनुसार, 50 पैशांपेक्षा कमी रक्कम सोडून देऊन पुढच्या पूर्ण रुपयामध्ये रक्कम राऊंड ऑफ करायला हवी. यानुसार, 10,649.46 रुपये म्हणजे 10,649 रुपयेच ग्राह्य धरायला हवेत. एवढंच नाही, तर क्रेडिट कार्डची थकबाकी पूर्ण भरण्यास उशीर झाल्यास, फक्त उरलेल्या मूळ थकबाकीवरच (Outstanding Amount) दंड आकारला पाहिजे, असं RBI चं स्पष्ट म्हणणं आहे. शिवाय, पेमेंटची तारीख उलटून गेल्यानंतर तीन दिवसांनीच लेट फी लावता येते.

समीर यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, अनेक लोकांनी आपले असेच अनुभव शेअर केले आहेत. बँकेकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यास RBI च्या बँकिंग लोकपालाकडे (Banking Ombudsman) तक्रार करण्याचा सल्ला अनेक जण कमेंट्समध्ये देत आहेत.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Hyundai Grand i10 Nios Offers: ह्युंदाईच्या या लोकप्रिय कारवर मिळतायत बंपर ऑफर्स!
OnePlus Ace 7: बाजारात येतोय वनप्लसचा नवा फोन, भन्नाट फीचर्स पाहून थक्क व्हाल