
बागकाम करण्याचा विचार प्रत्येकजण करतो, पण चांगली रोपे किंवा कधीकधी बियाणे न मिळाल्याने हा विचार सोडून द्यावा लागतो. तुम्हालाही असे वाटत असेल, तर तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शकता. तुम्हाला भाज्या उगवण्यासाठी रोपे किंवा बियाणांची गरज भासणार नाही. तुम्हाला फक्त कटिंग किंवा कलमांची गरज लागेल आणि तुमच्या किचन गार्डनमध्ये भाज्या उगवतील. जाणून घ्या त्या भाज्यांबद्दल, ज्या तुम्ही सहजपणे कटिंगच्या मदतीने उगवू शकता.
जर तुम्हाला मातीत पुदिना लावायचा असेल, तर फक्त पुदिन्याचे देठ मातीत लावा. असे केल्याने काही वेळातच पुदिन्याला मुळे फुटू लागतात आणि नवीन पाने येऊ लागतात. यामुळे तुम्ही सहजपणे ताजा पुदिना घरीच उगवू शकाल.
हिवाळ्याच्या हंगामात पातीचा कांदा भरपूर येतो. तुमच्याकडे काही जुने कांदे असतील, तर कांद्याचा मुळाकडचा भाग मातीत लावा. एका कुंडीत लहान ५ ते ६ कांदे सहज लावता येतील. १०-१५ दिवसांनंतर तुम्ही तुमच्या बागेत हिरव्या पाती पाहू शकता. त्या ताज्या ताज्या बनवा आणि घरच्यांना खाऊ घाला.
लसणाची एक पाकळी मातीत दाबल्यास काही दिवसांतच त्याला अंकुर फुटतो. तुम्ही लसणाच्या पातीचा वापर डिशवर गार्निश करण्यासाठी करू शकता किंवा हिरव्या चटणीतही घालू शकता.
तुम्ही किचन गार्डनमध्ये सहजपणे आले सुद्धा लावू शकता. आले लावण्यासाठी आल्याचा 'डोळा' असलेला भाग मातीत लावा. हलके ऊन आणि ओलसर मातीत आल्याचे रोप सहज उगवेल.
तुम्ही किचन गार्डनमध्ये सहजपणे पालकाचे मुळासकट देठ मातीत लावून ताजा पालक उगवू शकता. मेथीचा मुळाकडचा भागही मातीत लावल्यास हिरवी पाने उगवतील.
जेव्हाही तुम्ही कटिंगपासून भाज्या लावत असाल, तेव्हा लक्षात ठेवा की माती भुसभुशीत असावी आणि त्यात सेंद्रिय खत मिसळलेले असावे. तुम्हाला रोज पाणी घालायचे नाही, तर माती हलकी ओलसर ठेवायची आहे. कुंडीवर दररोज ३ ते ५ तास ऊन पडले पाहिजे. तुम्ही लहान कुंडी वापरली तरी कोणतीही अडचण येणार नाही.