Good News : यामाहा कंपनी ७० व्या वर्धापनदिन साजरा करत आहे. यानिमित्त यामाहा कंपनीकडून R15 सिरीज बाईकवर मोठ्या सवलतीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे तरुणांना त्यांची आवडती बाईक ऑफर किमतीत खरेदी करता येणार आहे.
यामाहा मोटरच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त, लोकप्रिय R15 सिरीजवर ५,००० रुपयांची सूट जाहीर केली आहे. नवीन किंमत १,५०,७०० रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होईल.
24
रेसिंग स्टाईलची R15 बाईक
Yamaha R15 ने भारतीय बाजारात प्रवेश केल्यापासून एंट्री-लेव्हल परफॉर्मन्स सेगमेंटमध्ये क्रांती घडवली आहे. रेसिंग डिझाइन आणि उत्तम तंत्रज्ञानामुळे ही बाईक तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
34
यामाहा इंजिन
R15 मध्ये १५५ सीसी लिक्विड-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड इंजिन आहे. यात ट्रॅक्शन कंट्रोल, स्लिपर क्लच, क्विक शिफ्टर आणि अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत.