Gold Rate Today : सोने - चांदी दरात मोठी घसरण; आज किती आहे गोल्ड रेट?

Published : Jul 24, 2026, 01:05 PM IST
Gold Silver Rate Today

सार

Gold Silver Rate Today : सोने - चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. सोन्याचा चांदीच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे भारतीय बाजारात त्याच्या किमतीत चढ-उतार होत आहेत.

मुंबई : आज सोने दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव मागील दोन आठवड्यांपासून वाढला होता. मात्र आज या दरात १ ते २ टक्क्यांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतीय सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

काल गुरुवारी सोन्याचा भाव वाढला होता. काल १० ग्रॅम सोन्याचा दर १,४७,२८० रुपये इतका होता. आज शुक्रवारी सोन्याचा भाव ११०० रुपयांनी कमी झाला आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १,४६,१७० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव गुरुवारी १,३५,००० रुपये होता. आज या किमतीत १०१० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३३,९९० रुपये आहे.

आज १८ कॅरेट सोनं ८३० रुपयांनी कमी झालं आहे. आजचा १८ कॅरेटचा भाव १,०९,६३० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

चांदीचा भाव किती?

मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर चांदीचा भाव २,२७,१८० प्रति किलोग्रॅम इतका आहे. मात्र भारतीय सराफा बाजारात सोन्याचा एक किलोचा भाव २,३९,९०० रुपये आहे.

सोने दरात घसरण का?

सोने दरातील चढ-उतारामागे अनेक कारणं आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे त्याचा परिणाम सोने-चांदीवर होतो. शिवाय कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे जगभरात महागाईची भीती आहे. त्यामुळे अनेक गुंतवणुकदार सोन्यात गुंतवणूक करत नाहीये. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो आहे.

त्याशिवाय अमेरिका फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याची चिंता आहे. व्याजदरात वाढ झाली तर सोन्यासारख्या मौल्यवान धातूच्या दरात गुंतवणूक न करण्याचा कल दिसतो. त्याचा परिणामदेखील सोन्याचा दरावर होतो. या अशा अनेक कारणांमुळे गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक टाळत असल्याने त्याचा दरांवर परिणाम झाला आहे. चांदीच्या दरातही घट नोंदवण्यात आली आहे.

चांदीच्या दरात घसरण का?

चांदीचा वापर दागिन्यांसह इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहनं तसंच 5G चिप्समध्येही चांदीचा वापर केला जातो. या वापराच्या कमी अधिक मागणीमुळे चांदीच्या किमतीत चढ-उतार होताना दिसतात.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Brezza Safety Rating: मारुतीच्या ब्रेझाने करून दाखवलं! सेफ्टी स्टार किती पाहा?
ब्रेसलेट वॉच करा खरेदी, डिझाईन पाहून पडाल प्रेमात