Gold Rate : सोन्याचा भाव १.४३ लाखांवर; किमती कमी होणार का? तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती

Published : Jul 26, 2026, 03:18 PM IST
Gold Rate Today

सार

Gold - Silver Prices : सोने दरात सतत वाढ होत आहे. सोन्याचा भाव कमी होईल का? असा प्रश्न ग्राहकांकडून विचारला जातो. या प्रश्नावर तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुंबई : सोने दरात मागील दोन वर्षात मोठी वाढ झाली आहे. अशात सोनं खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. सोन्याचा भाव काही प्रमाणात कमी होईल, अशी अनेकांना आशा आहे. मात्र दिवसेंदिवस भाव वाढतोच आहे. यंदाच्या वर्षात सोने-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत.

काय आहे सोन्याचा भाव?

सोन्याचा दर एप्रिल २०२५ पर्यंत एक लाखांवर होता. पण त्यानंतर मात्र सोन्याचा भाव सतत वाढता होता. गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४३ हजार प्रति १० ग्रॅम इतका होता. सोन्याचा भाव कमी होईल का असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जातो. यावर सोने बाजारातील तज्ज्ञांकडून सोन्याचा दर कमी होण्याची शक्यता अतिशय कमी असल्याचं सांगितलं जात आहे.

सोने दर कमी होणार का? 

सोन्याचा आताचा दीड लाखांवर गेलेला दर, १ लाख रुपयांपर्यंत येणं हे शक्य नसल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षात २०२६ मध्ये सोन्याचा भाव १.४० लाख ते १.५० लाख यावरच असेल. प्रति १० ग्रॅमसाठी हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्या सोनं दीड लाखांच्या घरात आहे. मात्र सोन्याची घसरण तेव्हाच होऊ शकते, जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही मोठे बदल होतील. अमेरिकन डॉलरची मजबूती, फेडरल बँकेचे उच्च व्याजदर, अमेरिका-इराण संघर्ष कमी झाल्यास सोन्याचा दर काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तसंच जगभरातील बँका सोन्याची खरेदी वाढवत आहेत. ही खरेदी कमी झाली, तरच सोने दरावर दबाव येत तो कमी होऊ शकतो. या सर्व घटनांमध्ये बदल होत नाही, तोपर्यंत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता नाही, असं जगभरातील तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.

अनेक सोनं खरेदीदार सोन्याची किमत कमी होण्याची वाट पाहत आहेत. सोने दर कमी झाला की खरेदी करू असा ग्राहकांचा अंदाज असेल, तर ही मोठी चूक ठरू शकते. सोने दरात घसरण होण्याची वाट पाहण्यापेक्षा थोडी-थोडी खरेदी करणं फायद्याचं ठरेल. सोने दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत घसरण किंवा वाढ होऊ शकते. मात्र दीड लाखावरुन सोने दर थेट १ लाख किंवा त्याहून अधिक कमी होईल, अशी शक्यता नाही. त्यामुळे जेव्हा जमेल तेव्हा ग्राहकांनी सोनं खरेदी करणं हाच फायदेशीर उपाय आहे, असं मतं बाजारातील तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Purity Test : सोनं, चांदी, केसर खरं की खोटं? घरातल्या घरात ओळखण्याच्या सोप्या टिप्स
Car Loan : डाऊन पेमेंटशिवाय गाडी घेताय? थांबा, आधी हे धोके जाणून घ्या