
फक्त महागडे प्रोडक्ट्स वापरले म्हणजे तुमचा मेकअप एकदम भारी किंवा सुंदर दिसेल असं नाही. त्यासाठी तुम्हाला काही खास टिप्स फॉलो करण्याची गरज आहे. इन्स्टाग्रामवर एका मेकअप प्रोफेशनलने अशा ५ चुका सांगितल्या आहेत, ज्या मुली मेकअप करताना नेहमी करतात. चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या चुका आहेत, ज्या सुधारून तुम्ही छान मेकअप करू शकता.
चेहऱ्यावरचे डाग लपवण्यासाठी तुम्ही नेहमी ऑरेंज कलर करेक्टर वापरता का? जर असं करत असाल, तर थांबा. प्रत्येक स्किन टोनसाठी हा करेक्टर योग्य नसतो. डार्क सर्कल्ससाठी पीच कलर करेक्टर, जास्त पिगमेंटेशन असेल तर ऑरेंज करेक्टर आणि चेहऱ्याच्या गरजेनुसार योग्य कलर करेक्टर वापरा. यामुळे चेहरा नॅचरल दिसतो.
तुम्ही पण फाउंडेशन थेट ब्रशवर घेऊन चेहऱ्यावर लावता का? असं अजिबात करू नका. ब्रशवर फाउंडेशन घेतल्यास ते जास्त प्रमाणात लागतं आणि चेहऱ्यावर नीट ब्लेंड होत नाही. त्यामुळे तुमचा लुक पॅची दिसू शकतो. त्याऐवजी, आधी चेहऱ्यावर फाउंडेशनचे छोटे-छोटे डॉट लावा आणि त्यानंतर ब्रश, स्पंज किंवा बोटांनी ते व्यवस्थित ब्लेंड करा. यामुळे तुम्हाला नॅचरल फिनिश मिळेल आणि मेकअप खूप छान दिसेल.
हे पण वाचा: Trendy Jhumka Bali: झुमका बाली इअररिंगच्या ५ फॅन्सी डिझाइन्स, श्रावण महिन्यासाठी निवडा खास पीस
आयब्रोचा मेकअप करताना, त्याला स्पूलीने (spoolie) सेट करणं खूप गरजेचं आहे. असं केल्याने केस जागेवर येतात आणि आयब्रोचा योग्य आकारही समजतो. आयब्रो पेन्सिलने शेप दिल्यानंतर पुन्हा एकदा ब्रश नक्की करा. यामुळे तुम्हाला एकदम नॅचरल लुक मिळेल.
लिप लायनर लावल्यानंतर लिपस्टिक लावायची, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण काही मेकअप आर्टिस्ट सांगतात की, लिपस्टिक लावल्यानंतर लिप लायनर नक्की वापरा. यामुळे ओठांच्या आकाराला अधिक चांगल्या प्रकारे डिफाइन करण्यास मदत मिळते.
हे पण वाचा: श्रावणात पंजाबी पटियाला सूट घालून दाखवा देसी स्वॅग, निवडा या ६ डिझाइन्स