Gadget News: मुलं बाहेर खेळायला गेली की ती कुठे आहेत, सुरक्षित आहेत का, अशी चिंता पालकांना लागून राहते. पण आता काळजीचं कारण नाही. मुलांच्या सुरक्षेसाठी imoo Kids Phone Watch Z1 नावाचं एक खास स्मार्टवॉच बाजारात आलं आहे.
imoo Z1 या 4G स्मार्टवॉचमध्ये 2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. मुलं याच्या मदतीने पालकांशी HD व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलवर बोलू शकतात. हे कॉल्स वाय-फाय किंवा मोबाईल डेटावर चालतात. अडचणीच्या वेळी मुलं SOS बटण दाबू शकतात, ज्यामुळे पालकांना लगेच अलर्ट मिळतो. हे घड्याळ अँड्रॉइड आणि iOS दोन्ही फोनना सपोर्ट करतं.
25
मिळणार अचूक लोकेशन ट्रॅकिंग
या स्मार्टवॉचमध्ये GPS ट्रॅकिंग सिस्टीम आहे. यात गुगल मॅप्सच्या सपोर्टसह ५ सॅटेलाइट पोझिशनिंग सिस्टीम काम करतात. त्यामुळे तुमचं मूल कुठे आहे, हे जवळपास १० मीटरच्या अचूकतेने समजतं. पालक आपल्या मोबाईलमधील imoo ॲपद्वारे मुलांचं रिअल-टाइम लोकेशन पाहू शकतात. मुलं शाळेत, खेळायला किंवा प्रवासात असताना त्यांच्यावर सहज लक्ष ठेवता येतं.
35
मुलांसाठी खास मजबूत डिझाइन
हे स्मार्टवॉच खास 3 ते 14 वयोगटातील मुलांसाठी बनवलं आहे. याचं डिझाइन शॉक-प्रूफ आणि डस्ट-प्रूफ आहे. याला IPX8 वॉटर रेझिस्टंट रेटिंग मिळालं आहे, त्यामुळे पाण्यामुळे किंवा पावसात भिजल्यास काही अडचण येत नाही. स्क्रीन सेफ टेक्नॉलॉजीमुळे स्क्रीन खराब होण्याची शक्यता कमी होते. कंपनी यासाठी नियमितपणे सॉफ्टवेअर अपडेट्ससुद्धा देते.
या घड्याळाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पॅरेंटल कंट्रोल. पालक आपल्या मोबाईलमधील imoo ॲपद्वारे अनेक सेटिंग्स कंट्रोल करू शकतात. उदाहरणार्थ, ते मुलांसाठी विश्वासू कॉन्टॅक्ट्स जोडू शकतात, अनोळखी नंबर ब्लॉक करू शकतात, कॉल लॉग्स पाहू शकतात आणि रिमाइंडर सेट करू शकतात. यामुळे मुलांचं कम्युनिकेशन सुरक्षित राहतं.
55
क्लास मोड, स्ट्रेंजर रिजेक्शन आणि फॅमिली कनेक्टिव्हिटी
शाळेच्या वेळेत मुलांचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून यात 'क्लास मोड' आहे. अनोळखी व्यक्ती मुलांना संपर्क करू नये यासाठी 'स्ट्रेंजर रिजेक्शन' फीचर आहे. imoo ॲपद्वारे कुटुंबातील सदस्य एकमेकांशी फॅमिली चॅट, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करू शकतात. या स्मार्टवॉचमध्ये 740mAh बॅटरी असून, 128GB स्टोरेज आहे. हे वाय-फाय आणि 4G दोन्हीला सपोर्ट करते आणि यात नॅनो सिम कार्ड वापरता येतं.