Home Decor: DIY करत बसू नका! 100 रुपयांत मिळवा घरासाठी 10+ जबरदस्त वस्तू

Published : Apr 07, 2026, 05:13 PM IST

Home Decor Items: प्रत्येकाला आपलं घर सुंदर ठेवायला आवडतं. सध्या डोपामाइन डेकोरेशनचा (Dopamine Decoration) ट्रेंडही खूप गाजतोय. पण DIY मध्ये वेळ घालवण्याऐवजी, तुम्ही 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक सुंदर वस्तू खरेदी करू शकता. 

PREV
17
आपलं घर सुंदर बनवायला प्रत्येकालाच आवडतं, पण त्यासाठी तासभर DIY करत बसायला सगळ्यांकडे वेळ नसतो. अशावेळी फक्त १०० रुपयांच्या आत घरासाठी सुंदर वस्तू मिळाल्या तर? आजकाल बाजारात आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर इतके बजेट-फ्रेंडली पर्याय उपलब्ध आहेत की तुम्ही जास्त मेहनत न करताही आपलं घर स्टायलिश आणि ट्रेंडी बनवू शकता.
27
वुडन फ्रेम डेकोरेशन पीस फॉर वॉल
आजकाल रिकाम्या भिंतींवर काहीतरी लावण्याचा ट्रेंड आला आहे. भिंत सजवण्यासाठी वुडन फ्रेम डेकोरेशन हा एक उत्तम पर्याय आहे. यात वेगवेगळ्या फ्रेममध्ये पक्षांची डिझाइन असते. तुम्हाला फक्त ते विकत घेऊन, स्टिकर काढून भिंतीवर चिकटवायचं आहे. अशा ट्रेंडी वस्तू तुम्हाला Meesho, Flipkart किंवा Amazon वर 100 रुपयांच्या आत सहज मिळतील.
37
हैंगिग डेकोर पीस
घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्ही बटरफ्लाय किंवा घुबडाच्या डिझाइनचे हँगिंग डेकोर पीस खरेदी करू शकता. याच्या खाली 'Evil Eye' बनवलेलं असतं, जे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतं असं मानलं जातं. तुम्ही हे डेकोर पीस घराच्या मुख्य दारावर लावू शकता.
47
मिनिंगफुल वर्ड डेकोर पीस
तुम्ही घरात एखादा असा कोपरा तयार करत असाल, जो क्रिएटिव्ह असण्यासोबतच काहीतरी संदेश देईल, तर तुम्ही भिंतीवर असे 'मिनिंगफुल वर्ड डेकोर पीस' लावू शकता. या प्रकारच्या वस्तू तुम्हाला Meesho वर फक्त 90 ते 100 रुपयांमध्ये मिळतील.
57
फ्लावर पॉट डेकोर पीस
लिव्हिंग रूममधील टेबल किंवा शेल्फवर ठेवण्यासाठी तुम्ही काही डेकोर पीस शोधत असाल, तर हे डिझाइन पाहू शकता. फ्लॉवर पॉटमुळे खोलीला एक फ्रेश लूक मिळतो. तुम्ही तुमच्या आवडीच्या फुलांसोबत असे छोटे आणि क्युट पॉट्स घेऊ शकता. यांची किंमतही 80 ते 100 रुपयांच्या दरम्यान असते.
67
फोटो फ्रेम

एक सिंगल फोटो फ्रेम लावायची असो किंवा भिंतीवर क्लस्टर डिझाइन करायचं असो, आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम्स उपलब्ध आहेत. यांची किंमत 100 ते 500 रुपयांपर्यंत असू शकते. फक्त तुमच्या फोटोच्या आकारानुसार फ्रेम निवडा आणि तुमच्या होम डेकोरमध्ये तिचा समावेश करा. 

77
छोटे डेकोरेटिव बास्केट

छोट्या-छोट्या डेकोरेटिव्ह बास्केटची सध्या बाजारात खूप चलती आहे. या तुमच्या घराला एक 'एस्थेटिक' (aesthetic) लूक देतात. तुम्ही या बास्केट भिंतीवर सजवण्यासाठी किंवा लहान-सहान वस्तू ठेवण्यासाठी वापरू शकता. 

Read more Photos on

Recommended Stories