Free Business Ads: तुमच्या व्यवसायासाठी मोफत जाहिरात बनवायची आहे? मग Google Gemini आणि Meta AI सारखे टॉप AI टूल्स वापरून प्रोफेशनल क्वालिटीचे फोटो आणि व्हिडिओ जाहिराती कशा बनवायच्या, याची सोपी पद्धत जाणून घ्या.
आजच्या काळात कॅफे असो, शॉपिंग मॉल किंवा कोणताही छोटा व्यवसाय, चांगली जाहिरात खूप गरजेची आहे. पूर्वी यासाठी मोठं बजेट आणि टीम लागायची. पण आता AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आल्यामुळे सगळं चित्रंच बदललंय. तुम्ही आता एकही पैसा खर्च न करता घरबसल्या प्रोफेशनल जाहिराती बनवू शकता.
24
Google Gemini
फोटो आणि व्हिडिओ बनवण्यात सध्या Google Gemini आघाडीवर आहे. इथे तुम्ही ट्रेंडिंग स्टाइलच्या इमेजेस तयार करू शकता. इतकंच नाही, तर 'Google Vids' वापरून सिनेमॅटिक स्टाइलचे प्रोफेशनल व्हिडिओही बनवू शकता. यात बॅकग्राउंड म्युझिक (Soundtrack) जोडण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
34
AI (Meta AI)
सोशल मीडिया मार्केटिंगसाठी Meta AI सर्वोत्तम आहे. हे टूल व्हिडिओमध्ये संगीत जोडायला, रीमिक्स करायला आणि लिप-सिंक पर्यायांमधून आकर्षक रील्ससारख्या जाहिराती बनवायला मदत करतं. प्रसिद्ध डायलॉग्स वापरून तुमच्या ब्रँडचा प्रचार करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
बहुतेक AI ॲप्स फक्त फोटोच नाही, तर त्यासाठी लागणारा आकर्षक मजकूर (Text) आणि लोगो कुठे लावायचा याच्या आयडियासुद्धा देतात. तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार फोटो आणि व्हिडिओ एकत्र करून अवघ्या एका मिनिटात जाहिरात तयार करू शकता.