FASTag KYV Update : आजपासून हा नियम पाळला नाही तर तुमचा फास्टॅग होईल बंद, टोल नाक्यावर दुप्पट पैसे भरावे लागतील

Published : Nov 01, 2025, 08:22 AM IST

FASTag KYV Update : 1 नोव्हेंबर 2025 पासून, केवायसी पूर्ण न केलेले फास्टॅग निष्क्रिय केले जातील. ही 'नो युवर व्हेईकल' प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करता येते. हे न केल्यास, बॅलन्स असूनही फास्टॅग काम करणार नाही आणि दुप्पट टोल भरावा लागेल.

PREV
16
फास्टॅग

देशभरातील टोल प्लाझांवरून वाहने वेगाने जाण्यासाठी फास्टॅग प्रणाली आहे. पण त्यासाठी आत नो युवर व्हेईकल हे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचा फास्टॅग निष्क्रिय होईल.

26
नोव्हेंबरपासून ही गोष्ट अनिवार्य

1 नोव्हेंबर 2025 पासून, केवायव्ही पूर्ण न केलेल्या वाहनांचे फास्टॅग आपोआप निष्क्रिय होतील. त्यामुळे तुम्ही टोल प्लाझावर गेला तर तो काम करणार नाही. तुम्हाला रोख स्वरुपात टोल भरावा लागेल. जो दुप्पट असेल.

36
केवायव्ही म्हणजे काय?

केवायव्ही म्हणजे 'नो युवर व्हेईकल'. गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने हे अनिवार्य केले आहे. प्रत्येक फास्टॅग वाहनाशी जोडलेला असावा, असे NHAI चे निर्देश आहेत. पण ही प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी वाहन मालकाची आहे. त्यामुळे तुमचा फास्टॅग आजच अपडेट करा.

46
केवायव्ही प्रक्रिया कशी करावी?

केवायव्ही प्रक्रिया ऑनलाइन करता येते. गाडीचे आरसी आणि मालकाचे ओळखपत्र आवश्यक आहे. बँकेच्या ॲप/साईटवर 'Update KYV' निवडून कागदपत्रे अपलोड करा. OTP ने व्हेरिफाय करा. ही पद्धत अतिशय सोपी आहे. पण आजच करणे आवश्यक आहे.

56
हे नाही केले तर काय होईल?

तुम्ही केवायव्ही पूर्ण न केल्यास, तुमचा फास्टॅग निष्क्रिय होईल. बॅलन्स असूनही तो काम करणार नाही. तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल. त्यामुळे १ नोव्हेंबरपूर्वी हे पूर्ण करा. अन्यथा टोल प्लाझावर तुम्हाला नाहक मानसिक त्रात होईल. आणि आर्थिक फटकाही बसेल.

66
हा निर्णय का घेण्यात आला?

केवायव्हीमुळे मालकांची ओळख पटवणे, चोरीची वाहने शोधणे आणि चुकीचे टोल शुल्क टाळता येते. गाडी विकल्यास किंवा नंबर प्लेट बदलल्यास केवायव्ही पुन्हा करावे लागेल. यामुळे सरकारकडे तुमच्या गाडीची संपूर्ण आणि अचुक माहिती राहिल.

Read more Photos on

Recommended Stories