Faraday Cage Effect: आज हाय-स्पीड इंटरनेटचा जमाना आहे, पण लिफ्टमध्ये शिरताच मोबाईलची रेंज गायब होते. हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आला असेल. पण स्मार्टफोनचं कनेक्शन जाण्यामागे कोणतीही तांत्रिक अडचण नाही, तर एक साधं विज्ञान आहे.
आपले स्मार्टफोन आणि टेलिकॉम नेटवर्क खूप आधुनिक आहेत. आपण कुठेही हाय-स्पीड इंटरनेट वापरतो. पण लिफ्टमध्ये पाय ठेवताच फोन काम करेनासा होतो. हवेत सगळीकडे सिग्नल असूनही लिफ्टमध्ये का नसतात? यामागचं विज्ञान समजून घेऊया.
28
सिग्नलला अडथळा का येतो?
मोबाईल सिग्नल्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिओ लहरी (electromagnetic radio waves). त्यांच्या मार्गात काही गोष्टी अडथळा निर्माण करतात.
38
लिफ्टचं मेटलचं कवच
लिफ्टची केबिन स्टेनलेस स्टीलसारख्या धातूच्या पत्र्यांपासून बनवलेली असते. हा धातू इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींना आत येऊ देत नाही, उलट त्यांना बाहेरच्या बाहेरच परत पाठवतो.
विज्ञानाच्या भाषेत याला 'फॅरेडे केज' (Faraday Cage) इफेक्ट म्हणतात. या तत्त्वानुसार, धातूच्या बंद डब्यात बाहेरच्या रेडिओ लहरी प्रवेश करू शकत नाहीत.
58
काँक्रीट आणि विटांच्या भिंती
लिफ्ट ज्या जागेतून (Shaft) वर-खाली जाते, ती जागा जाड काँक्रीट आणि विटांनी बांधलेली असते. या भिंती मोबाईलच्या रेडिओ लहरींना प्रभावीपणे अडवतात.
68
इंटिरिअरमुळेही सिग्नल वीक
लिफ्टच्या आत वापरलेल्या टाइल्स, लॅमिनेट आणि वॉलपेपरमुळे मोबाईल नेटवर्क आणखी कमकुवत होतं. त्यामुळे सिग्नल मिळणं अजूनच कठीण होतं.
78
काचेच्या लिफ्टमध्ये मिळतो सिग्नल
अनेक इमारतींमध्ये सिग्नल बूस्टर बसवलेले असतात, पण तरीही चालत्या लिफ्टमध्ये सिग्नल मिळणं एक आव्हान आहे. जर लिफ्ट पूर्णपणे काचेची बनलेली असेल, तरच चांगला सिग्नल मिळू शकतो.
88
लिफ्टमध्ये अडकल्यास काय करावं?
जर तुम्ही लिफ्टमध्ये अडकलात आणि मोबाईलला रेंज नसेल, तर घाबरू नका. लिफ्टमधील 'इंटरकॉम' किंवा 'इमर्जन्सी कॉल बटण' दाबून इमारतीच्या सुरक्षा टीमशी संपर्क साधा.