सध्या नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरल्या जातात. अशातच बनावट क्यूआर कोड आणि लिंकपासून दूर राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सविस्तर...
QR Code Scam : सध्याच्या डिजिटल युगात क्यूआर कोड आणि बनावट लिंकच्या माध्यमातून सायबर हल्ले केले जातात. क्यूआर कोडचा वापर सर्वसमान्यपणे पार्किंग, शॉपिंग किंवा अन्य कामांच्या पेमेंटसाठी करतो. याच क्यूआर कोडचा सध्या दुरपयोग केला जात आहे. दुसऱ्या बाजूला बनावट लिंकच्या माध्यमातूनही नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे दिवसागणिक नवी प्रकरणे समोर येतात. या दोन्ही फसवणूकीच्या मार्गांपासून दूर राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
क्यूआर कोडच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीची प्रकरण दिवसागणिक वाढत चालली आहे. खासकरुन बनावट क्यूआर कोड पार्किंग लॉट्स, हॉटेल किंवा बिल पेमेंट्सच्या येथे लावले जातात. हे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंत पैसे थेट फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात जमा होतात. अशातच दुकानदाराला विचारुन किंवा खात्रीपूर्वक क्यूआर कोडची माहिती घेतल्यानंतरच पेमेंट करा. याशिवाय डिजिटल पेमेंट अॅपचा वापर करतानाही आपला पिन क्रमांक सांगू नका.
लिंकच्या माध्यमातून फसवणूक करण्यासाठी बनावट वेबसाइट, ईमेल लिंक अथवा मेसेजचा वापर केला जातो. यामध्ये असणाऱ्या लिंकवर क्लिक केल्यानंतर व्यक्तीगत माहिती फसवणूकदारापर्यंत पोहोचली जाते. यामध्ये तुमचा खासगी डेटा चोरी करत बँक खाते रिकामे होऊ शकते. अशातच लिंकच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीपासून दूर राहण्यासाठी कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. याशिवाय एखाद्या वेबसाइटची URL आणि HTPPS असणाऱ्या सुरक्षित वेबसाइटवरच विश्वास ठेवा.
हेही वाचा : मुलांच्या शिक्षणासाठी योग्य गुंतवणूक कशी करावी, पर्याय जाणून घ्या
तिकीट बुकिंग, हॉटेल रुम रिझर्व्हेशन किंवा शॉपिंग वेबसाइटचे क्लोनिंग मोठ्या प्रमाणात केले जात असल्याची प्रकरणे समोर येतात. या वेबसाइट अधिकृत संकेतस्थळासारख्या दिसतात. याच्याच माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जाते. या फसवणूकीपासून दूर राहण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी वेबसाइट तपासून पाहा. याशिवाय वेबसाइटबद्दलची अधिक माहिती घेण्यासह ऑनलाइन रिव्हू वाचा.
आणखी वाचा :
लाडकी बहिण योजनेतील 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार?, महत्त्वाची माहिती आली समोर!