EPFO New Rules 2025 : PF काढण्याचे 8 नवे नियम लागू! 100% फंड कधी आणि कसा काढता येणार? जाणून घ्या सविस्तर

Published : Jan 13, 2026, 04:46 PM IST

EPFO New Rules 2025 : EPFO ने ऑक्टोबर 2025 पासून पीएफ काढण्याचे नियम सोपे केले, 13 किचकट नियमांऐवजी आता 5 मुख्य विभाग आहेत. या बदलामुळे कर्मचाऱ्यांना वैद्यकीय, शिक्षण, विवाह आणि घरासाठी त्यांच्या पीएफ बॅलन्सपैकी 75% पर्यंत रक्कम काढणे सोपे झाले आहे.

PREV
17
PF काढण्याचे 8 नवे नियम लागू!

EPFO New Rules 2025 : पीएफ (Provident Fund) काढताना अनेक कर्मचाऱ्यांना आजवर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. नियम गुंतागुंतीचे, वेगवेगळ्या कॅटेगरीज, सेवा कालावधीचे वेगवेगळे निकष यामुळे अनेकदा तासन्‌तास माहिती शोधावी लागायची. योग्य माहिती नसल्यामुळे अनेक पीएफ क्लेम्स रिजेक्टही होत होते. हीच अडचण दूर करण्यासाठी EPFO (Employees’ Provident Fund Organisation) ने 2025 मध्ये पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आधी जिथे 13 वेगवेगळे नियम आणि कॅटेगरीज होत्या, तिथे आता ते कमी करून फक्त 5 मुख्य सेक्शन करण्यात आले आहेत. त्यामुळे गरज असेल तेव्हा सदस्यांना आपला पैसा काढणे अधिक सोपे होणार आहे. 

27
EPFO चे नवे नियम नेमके काय आहेत?

ऑक्टोबर 2025 पासून EPFO ने आंशिक पीएफ विड्रॉलसाठी एक सोपी आणि एकत्रित प्रणाली लागू केली आहे. याआधी प्रत्येक कारणासाठी वेगवेगळा नियम आणि 2 ते 7 वर्षांचा सेवा कालावधी ठरवलेला होता. यामुळे गोंधळ निर्माण होत असे आणि अनेक क्लेम्स नाकारले जात. आता मात्र जवळजवळ सर्व प्रकारच्या विड्रॉलसाठी किमान सेवा कालावधी फक्त 12 महिने ठेवण्यात आला आहे. हा बदल कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. 

37
आता किती PF काढता येईल?

नव्या नियमांनुसार, पीएफ काढताना आता कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचं योगदान तसेच त्यावर मिळालेलं व्याज या सर्वांचा समावेश केला जाईल. यामुळे सदस्यांना त्यांच्या एलिजिबल पीएफ बॅलेन्सपैकी 75% पर्यंत रक्कम काढता येणार आहे. आधीच्या तुलनेत ही रक्कम अधिक असून पैसे लवकर मिळणार आहेत. 

47
12 महिने नोकरी केल्यानंतर 100% PF कधी काढता येईल?

EPFO सदस्य खालील 5 परिस्थितींमध्ये पीएफ बॅलेन्सचा 100% पर्यंत निधी काढू शकतात.

स्वतःसाठी किंवा कुटुंबीयांच्या उपचारांसाठी

एका आर्थिक वर्षात कमाल 3 वेळा.

स्वतःच्या किंवा मुलांच्या शिक्षणासाठी

संपूर्ण पीएफ मेंबरशिपदरम्यान एकूण 10 वेळा. 

स्वतःच्या किंवा मुलांच्या लग्नासाठी

कमाल 5 वेळा.

घर खरेदी, बांधकाम, गृहकर्ज फेड किंवा घर दुरुस्तीसाठी

एकूण 5 वेळा.

विशेष परिस्थिती (कारण न देता)

एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीएफ काढता येईल. 

57
रिटायरमेंटसाठी 25% रक्कम सुरक्षित

नवे नियम लागू झाले असले तरी EPFO ने निवृत्ती सुरक्षेसाठी 25% रक्कम राखून ठेवण्याचा नियम कायम ठेवला आहे. आकडेवारीनुसार, वारंवार पीएफ काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन 8.25% चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळत नव्हता. विशेषतः कमी उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट सेव्हिंगवर याचा परिणाम होत होता. त्यामुळे आता 25% बॅलेन्स अनिवार्यपणे सुरक्षित ठेवण्यात येतो. 

67
नोकरी गेल्यास PF काढण्याची सवलत

जर एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी गेली असेल, तर

75% पीएफ रक्कम लगेच काढता येते

उर्वरित 25% एक वर्षानंतर काढता येते

काही विशेष प्रकरणांमध्ये पूर्ण पीएफ काढण्याची मुभा दिली जाते, जसे की

वयाच्या 55 वर्षांनंतर निवृत्ती

कायमस्वरूपी अपंगत्व

स्वेच्छानिवृत्ती

भारत कायमचा सोडून परदेशात स्थलांतर 

77
EPS (पेन्शन) वर होणार का परिणाम?

या बदलांचा कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनवर कोणताही परिणाम होत नाही. 10 वर्षांची सेवा पूर्ण होण्यापूर्वी कर्मचारी EPS रक्कम काढू शकतो. मात्र निवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळवण्यासाठी किमान 10 वर्षांची EPS मेंबरशिप आवश्यक आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories