गुड न्यूज! आता PF चे पैसे काढणं होणार सोपं; EPFO चं नवं UPI अ‍ॅप येतंय, पाहा काय आहेत फीचर्स

Published : Apr 07, 2026, 04:56 PM IST

EPFO new app for PF withdrawal: कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) लवकरच एक नवीन मोबाईल अ‍ॅप लाँच करत आहे, जे UPI शी जोडलेले असेल. या अ‍ॅपमुळे सदस्य आपल्या पीएफ खात्यातून ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम काही मिनिटांत थेट बँक खात्यात काढू शकतील. 

PREV
15
गुड न्यूज! आता PF चे पैसे काढणं होणार सोपं

नवी दिल्ली: भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यातून पैसे काढण्यासाठी आता तासनतास संगणकासमोर बसण्याची किंवा क्लेम सेटल होण्याची दीर्घकाळ वाट पाहण्याची गरज उरणार नाही. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलत असून, लवकरच एक नवे मोबाईल अ‍ॅप लाँच होणार आहे. 

25
आता UPI द्वारे थेट खात्यात जमा होणार पैसे

या अ‍ॅपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे अ‍ॅप BHIM आणि इतर UPI प्लॅटफॉर्मशी जोडले जाणार आहे. सध्या पीएफ काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलवरून चालते, ज्याला बराच वेळ लागतो. मात्र, नवीन अ‍ॅपमध्ये यूपीआय इंटीग्रेशनमुळे काही मिनिटांतच पीएफची रक्कम थेट बँक खात्यात ट्रान्सफर करणे शक्य होणार आहे. या अ‍ॅपची टेस्टिंग अंतिम टप्प्यात असून लवकरच ते सर्वांसाठी खुले होईल. 

35
७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार

नवीन नियमानुसार, सदस्य आपल्या पीएफ शिल्लकीपैकी जास्तीत जास्त ७५ टक्के रक्कम तातडीने काढू शकतील. पीएफ फंडाची सुरक्षितता आणि भविष्यातील तरतूद म्हणून खात्यात किमान २५ टक्के रक्कम ठेवणे अनिवार्य असेल. जर एखाद्याची नोकरी गेली, तर उर्वरित २५ टक्के रक्कम १२ महिन्यांनंतर काढता येईल. 

45
अ‍ॅपची खास वैशिष्ट्ये

संपूर्ण डिजिटल प्रक्रिया: कागदपत्रांचा कमीत कमी वापर आणि पूर्णपणे पेपरलेस व्यवहार.

मोबाईल फ्रेंडली: आता डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची गरज नाही, सर्व कामे मोबाईलवर होतील.

वेगवान क्लेम: यूपीआयमुळे ट्रान्झॅक्शनचा वेग वाढणार. 

55
नवं अ‍ॅप येईपर्यंत 'हा' पर्याय वापरा!

जोपर्यंत नवीन अ‍ॅप पूर्णपणे रोलआउट होत नाही, तोपर्यंत युझर्स UMANG अ‍ॅप द्वारे आपला पीएफ क्लेम करू शकतात. उमंग अ‍ॅपमध्ये सध्या यूपीआयचा पर्याय नसला तरी, मोबाईलवरून क्लेम फाइल करण्याची प्रक्रिया तिथेही अत्यंत सोपी आणि प्रभावी आहे.

ईपीएफओकडे सध्या जवळपास २६ लाख कोटी रुपयांचा निधी असून, या नवीन तंत्रज्ञानामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories