मुंबई - EPFO 3.0 लवकरच सुरू होणार आहे. यात ८ कोटी PF सदस्यांना पाच नवीन सुविधा मिळणार आहेत. ATM-UPI द्वारे पैसे काढण्यापासून ते मृत्यू दाव्यांच्या जलद निपटार्यापर्यंत, सर्व तपशील जाणून घ्या.
कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) आता आपला नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म EPFO 3.0 आणत आहे. या प्लॅटफॉर्मचा उद्देश कर्मचारी सेवांना सोपे, पारदर्शक आणि जलद बनवणे आहे. यासाठी सरकारने इन्फोसिस, विप्रो आणि TCS यांसारख्या मोठ्या IT कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्या या प्लॅटफॉर्मच्या देखभाल आणि सुधारणा करतील.
या नवीन प्लॅटफॉर्ममुळे स्वयंचलित PF काढण्याची सुविधा आणि ATM द्वारे पैसे काढण्याची सोय उपलब्ध होईल. हा प्रकल्प जून 2025 मध्ये सुरू होणार होता, पण तांत्रिक चाचण्या आणि इतर कारणांमुळे थोडा उशीर झाला आहे. तरीदेखील, या उपक्रमामुळे सुमारे 8 कोटी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
24
EPFO 3.0 मधील महत्त्वाच्या सुविधा काय?
ऑनलाइन अर्ज आणि दुरुस्ती
EPFO 3.0 मध्ये कर्मचाऱ्यांना छोट्या चुका दुरुस्त करण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. ते OTP च्या मदतीने ऑनलाइनच बदल करू शकतील आणि आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकतील. यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी होईल.
उत्तम डिजिटल अनुभव
नवीन प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना अधिक सोपे आणि वापरण्यास सोयीस्कर डिजिटल प्लॅटफॉर्म मिळेल. यात ते आपले PF खाते शिल्लक, योगदानाची माहिती आणि स्थिती रिअल-टाइममध्ये पाहू शकतील. या डिजिटल बदलामुळे EPFO सेवा आणखी सुलभ आणि उपलब्ध होतील.
34
EPFO 3.0 मधील आणखी सुविधा काय?
एटीएममधून थेट पीएफ पैसे काढणे
नवीन प्लॅटफॉर्म आल्यानंतर कर्मचारी आपल्या पीएफ निधीचे पैसे थेट एटीएममधून काढू शकतील. हे अगदी बँक खात्यासारखेच असेल. यासाठी UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) सक्रिय करणे आणि बँक खात्यासोबत आधार जोडणे आवश्यक आहे. अचानक पैशांची गरज भासल्यास ही सुविधा खूप उपयोगी ठरेल.
UPI मधून तत्काळ पैसे काढणे
EPFO 3.0 मध्ये सदस्यांना UPI द्वारे लगेच पीएफचे पैसे काढण्याची सुविधा मिळेल. त्यामुळे अडचणीच्या वेळी कोणत्याही गुंतागुंतीशिवाय थेट पैसे मिळतील.
मृत्यू दावा त्वरित निकाली
EPFO ने मृत्यूच्या प्रसंगी दाव्याचे निपटारे सोपे करण्याचा निर्णय घेतला आहे. आता लहान मुलांसाठी गार्डियन सर्टिफिकेट (पालकत्व प्रमाणपत्र) लागणार नाही. यामुळे कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत मिळू शकेल.
EPFO 3.0 हा नवा डिजिटल प्लॅटफॉर्म प्रत्यक्षात जून 2025 मध्ये सुरू होणार होता, पण सततच्या तांत्रिक चाचण्या आणि सुधारणा यामुळे त्याचा लोकार्पण कार्यक्रम पुढे ढकलावा लागला.
सध्या EPFO आणि संबंधित मंत्रालये मिळून हा प्लॅटफॉर्म अधिक प्रभावी, सुरक्षित आणि वापरकर्ता-अनुकूल कसा करता येईल यावर काम करत आहेत. त्यामुळे हा उपक्रम सुरू झाल्यानंतर कर्मचारी वर्गाला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळेल.
अंदाजानुसार, हा प्लॅटफॉर्म लवकरच प्रत्यक्षात आणला जाईल आणि कोट्यवधी कर्मचार्यांना जलद व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देईल.