त्यानंतर त्याच बादलीत पुन्हा कोमट पाणी घ्या. नंतर त्यात २ चमचे डिटर्जंट पावडर, व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा घाला आणि चांगले मिसळा. पाणी गरम असल्याने हात वापरू नका. एक मोठी काठी वापरा. नंतर त्यात तीन थेंब डेटॉल घाला.
डेटॉल हे जंतुनाशक असल्याने फुटमॅटवरील जंतू सहजपणे निघून जातात. त्यानंतर फुटमॅट त्यात सुमारे एक तास भिजत ठेवा. एक तासानंतर प्रत्येक फुटमॅट सामान्य पाण्याने चांगले धुवा आणि उन्हात वाळवा.