इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये एआयचा होणार वापर, नवीन टेक्नॉलॉजीच्या वापराने गाडी चालवणं होणार सोपं

Published : Jun 10, 2026, 05:14 PM IST
Ather Energy

सार

एथर कंपनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी व्हॉइस कमांड हे नवीन स्मार्ट फीचर लॉन्च करत आहे. या AI-आधारित फीचरमुळे रायडर्स व्हॉइस कमांडद्वारे चार्जिंग स्टेशन शोधू शकतील आणि बॅटरीची माहिती मिळवू शकतील, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित होईल. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्पर्धात्मक बाजारात नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणले आहे.

सध्याच्या काळात इलेक्ट्रिक गाड्या घेण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. त्याच एक स्मार्ट फिचर लॉन्च केलं जाणार असून एथर कंपनी फीचर ओव्हर-द-एअर (OTA) अपडेटद्वारे उपलब्ध करून दिले जात आहे. या मोबाईलमधून चार्जिंग स्टेशन शोधणे, ट्रिपची माहिती मिळवणे आणि बॅटरीची सद्यस्थिती जाणून घेणे यासारखी कामे व्हॉइस कमांडद्वारे करता येतील. त्यामुळे वाहन चालवताना स्क्रीन ऑपरेट करण्याची गरज कमी होणार असून सुरक्षिततेलाही मदत मिळणार आहे.

कोणत्या मॉडेल्समध्ये हि सुविधा मिळणार? 

कंपनीने या सुविधेला लॉन्च केलं असून ते लिमिटेड एडिशनमध्येच दिल जाणार आहे. चार्जिंग स्टेशन शोधणे, ट्रिपची माहिती मिळवणे आणि बॅटरीची सद्यस्थिती जाणून घेणे यासारखी कामे व्हॉइस कमांडद्वारे करता येतील. त्यामुळे वाहन चालवताना स्क्रीन ऑपरेट करण्याची गरज कमी होणार असून सुरक्षिततेलाही मदत मिळणार आहे.

एआयचा वापर वाढवला 

कंपनीने एआय सिस्टीमचा वापर मोठ्या प्रमाणावर करणार असल्याचं सांगण्यात येणार आहे. आपण या मॉडेलमध्ये विचारलेले प्रश्नांची उत्तर एआयच्या अध्यमातून आपल्याला मिळणार आहेत. स्मार्टफोनमधील व्हर्च्युअल असिस्टंट प्रमाणे याचा रोल राहणार आहे. त्यामुळे हा नवीन प्रकारचा अनुभव ग्राहकांसाठी युनिक असाच असणार आहे.

इलेक्ट्रिक मार्केटमध्ये स्पर्धा झाली फास्ट 

इलेक्ट्रिक स्कुटरच्या मार्केटमध्ये स्पर्धा फास्ट झाली आहे. या क्षेत्रातील स्पर्धा नवीन टप्यावर असून नव्या ग्राहकांना अधिक अनुभव येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः तंत्रज्ञानप्रेमी तरुण ग्राहकांसाठी हे फीचर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकते.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

PhonePe, G Pay की Paytm... लोक सर्वात जास्त कोणतं अ‍ॅप वापरतात माहितीये?
Before Investing in a Mutual Fund : म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा