
Driving in Monsoon Tips : पावसाळा हा कडाक्याच्या उन्हापासून आराम देणारा ठरत असला तरीही वाहन चालवण्यासाठी आव्हानात्मक असतो. रस्त्यावर साचलेले पाणी, रस्ते निसरडे होणे, चिखल किंवा कमी लाईट्समुळे वाहन चालवणे कधीकधी मुश्किल होते. अशातच पावसाळ्यापूर्वी तुम्ही वाहनाची काळजी घेतल्यास अपघातापासून दूर राहू शकता.
पावसाळ्याच्या दिवसात कारच्या टायरची सुरक्षितता अधिक महत्वाची ठरते. जर टायर अधिक घासले गेले असल्यास ओलसर रस्त्यावर त्यांची पकड कमी होते. यामुळे रस्त्यावरुन कार घसरण्याची शक्यता वाढली जाते. यासाठी टायरच्या ट्रेडचा आकार तपासून पाहा आणि जर तो कमी झाल्यास नवा टायर लावण्याकडे लक्ष द्या. याशिवाय सर्व टायरमध्ये एकसमान प्रेशर आहे की नाही ते देखील पाहा.
मुसळधार पावसात लाइट्स कमी आणि पाण्यामुळे कार चालकाला समोरचे स्पष्टपणे दिसणे कठीण होते. अशातच कारच्या पुढील काचेवरील डाग किंवा पावसाचे पाणी काढण्यासाठी वाइपरचा वापर केला जातो. जर वाइपर जुने झाले असल्यास पावसाळ्यापूर्वी बदलून द्या. याशिवाय विंडशील्ड वॉटर टँकमध्ये पुरेसे फ्लूड देखील असू द्या
पावसाळ्यात वाहनाचे ब्रेक व्यवस्थितीत कामं करतायत की नाही हे तपासून पाहणे फार महत्वाचे असते. ब्रेक दाबल्यानंतर आवाज येत असेल किंवा कार ब्रेक लावूनही थांबत नसेल तर लगेच ब्रेक बदलून घ्या. सर्विस सेंटरमध्ये जाऊन ब्रेक संबंधित काम करा. ब्रेक पॅड, डिस्क आणि ब्रेक फ्लूडची स्थिती देखील तपासून पाहा, जेणेकरुन पावसाळ्यात कोणतीही समस्या येणार नाही.
अधिक ओलावा आणि पाण्यामुळे बॅटरी बंद होऊ शकते. बॅटरीच्या टर्मिनलवर गंज देखील पकडू शकतो. जो तुम्हाला स्वच्छ करावा लागेल. जर बॅटरी जुनी झाली असल्यास त्याची चालू राहण्याची क्षमता किती आहे हे पाहा.
कारमधील सनरुफ, दरवाज़े आणि अन्य ठिकाणी असणाऱ्या ड्रेनेज होल्सवर कधीकधी धूळ चिकटलेली असते. यामुळे पाणी बाहेर पडण्याऐवजी आतमध्ये जमा होते. याशिवाय दरवाजे आणि खिडक्यांचे रबर सील देखील तपासून पाहा. जर ते खराब झाले असल्यास पावसाचे पाणी केबिनमध्ये येऊ शकते.
हेडलाइट्स, टेललाइट्स आणि फॉग लाइट इंडिकेटर योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही ते तपासून पाहा. पावसाळ्यात कमी दृष्यता आणि धुक्यमुळे या गोष्टी व्यवस्थिती असणे महत्वाचे आहे. याशिवाय खराब किंवा बंद पडलेले कारचे बल्ब बदला. अशा लहान लहान गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही पावसाळ्यात सुरक्षितपणे ड्राइव्हिंग करू शकता.