स्वप्न शास्त्र: प्रत्येक स्वप्नाला काहीतरी महत्त्व असतं. प्रत्येक स्वप्न आपल्याला आयुष्यात घडणाऱ्या घटनांची आठवण करून देतं. या पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येकाला एक दिवस मरायचंच आहे. अशी मृत व्यक्ती स्वप्नात आल्यास त्याचा अर्थ काय असतो?
झोपेत असताना अनेक लोकांना नियमितपणे स्वप्ने पडतात. सकाळी उठल्यावर आपण अनेक स्वप्ने विसरून जातो. पण, काही स्वप्ने मात्र चांगलीच लक्षात राहतात. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्ने विनाकारण पडत नाहीत.
23
मृत व्यक्ती स्वप्नात निरोगी दिसल्यास...
आजाराने मृत झालेली व्यक्ती स्वप्नात निरोगी दिसल्यास, ते आनंदी आहेत आणि तुम्ही आयुष्यात पुढे जावे, असा तो संकेत असतो. मृत व्यक्ती रागात दिसल्यास, त्यांची इच्छा अपूर्ण आहे, असा अर्थ होतो.
33
मृत व्यक्ती स्वप्नात आनंदी दिसल्यास...
मृत व्यक्ती स्वप्नात आनंदी किंवा रडताना दिसल्यास ते शुभ मानले जाते. आशीर्वाद देताना दिसल्यास मोठे यश मिळते. जेवण मागितल्यास ते अशुभ मानले जाते. हसताना दिसल्यास इच्छापूर्तीचे संकेत असतात.