Bedtime Mistakes: अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही. प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉ. हंसा योगेंद्र यांच्या मते, आपल्या काही सवयीच याला कारणीभूत असतात. जाणून घेऊया कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत.
रात्रीच्या जेवणात तुम्ही जास्त किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवर होतो. तेलकट आणि मसालेदार पदार्थ पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे अस्वस्थता वाढते आणि झोप लागत नाही. त्यामुळे रात्री नेहमी हलकं आणि पचायला सोपं अन्न खा.
24
एक तास आधी मोबाईल बाजूला ठेवा
झोपण्यापूर्वी सोशल मीडिया स्क्रोल करणे किंवा मोबाईलवर सिनेमा, वेब सीरिज पाहिल्याने तुमचा मेंदू सक्रिय राहतो. यामुळे झोप लागणं कठीण होतं. त्यामुळे, झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल बाजूला ठेवणं खूप गरजेचं आहे.
34
उशिरापर्यंत काम करण्याची सवय बदला
अनेकांना रात्री उशिरापर्यंत काम करण्याची सवय असते. यामुळे तुमच्या शरीराची नैसर्गिक लय (Circadian Rhythm) बिघडते. परिणामी, झोपेसाठी आवश्यक हार्मोन्सची पातळी कमी होते आणि निद्रानाश (Insomnia) व शारीरिक थकवा यांसारख्या समस्या सुरू होतात.
तुम्ही खूप जास्त टेन्शन, तणाव किंवा रागात झोपायला गेलात, तर तुम्हाला शांत झोप लागणार नाही. अशावेळी शरीरात कॉर्टिसोल (Cortisol) आणि ॲड्रेनालाईन (Adrenaline) सारखे हार्मोन्स वाढतात, जे मेंदूला अधिक जागृत ठेवतात. जोपर्यंत मन शांत होत नाही, तोपर्यंत चांगली झोप अशक्य आहे.