
Vegetable Flower Vase Easy Idea at Home: घराच्या सजावटीसाठी काहीतरी नवीन आणि युनिक ट्राय करायचं असेल, तर सध्याचा 'व्हेजिटेबल वास' हा DIY ट्रेंड नक्की जाणून घ्या. भाज्यांपासून बनवलेले फ्लॉवर वास दिसायला खूप फ्रेश, प्रीमियम आणि स्टायलिश दिसतात, आणि विशेष म्हणजे हा सगळा प्रकार अगदी कमी खर्चात होतो. यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या डेकोरेशन साहित्याची गरज नाही. फक्त किचनमधल्या साध्या भाज्या वापरून आणि थोडी क्रिएटिव्हिटी दाखवून तुम्ही काचेच्या साध्या बरणीला एक जबरदस्त प्रीमियम लुक देऊ शकता. चला तर मग, भाज्यांपासून फ्लॉवर वास बनवण्याच्या ४ सोप्या पद्धती पाहूया.
उन्हाळ्यात जवळपास प्रत्येक घरात काकडी असतेच. याच काकडीचा वापर करून तुम्ही एक फ्रेश लुक देणारा फ्लॉवर वास बनवू शकता. यासाठी एक साधी काचेची बरणी घ्या. काकडीचे पातळ गोल काप करा. आता बरणीच्या आतल्या बाजूने काठाला हे काप एकावर एक चिकटवून लावा. मध्ये पाणी टाकून तुमची आवडती फुलं त्यात ठेवा. हा वास खूपच कूल, फ्रेश आणि नॅचरल लुक देतो. उन्हाळ्याच्या दिवसांसाठी तर हा एक परफेक्ट पर्याय आहे.
गाजराचा सुंदर रंग तुमच्या फ्लॉवर वासला खूपच आकर्षक बनवतो. गाजरापासून ब्राईट आणि आकर्षक फ्लॉवर वास बनवण्यासाठी, आधी गाजराचे पातळ गोल काप करा. आता हे काप बरणीच्या आतून चारही बाजूंनी व्यवस्थित लावा. यावर सुतळीचा धागा बांधल्यास अजून छान दिसेल. गाजराचा ऑरेंज रंग तुमच्या डेकोरेशनला एक वेगळाच 'पॉप' देईल.
झुकिनी (ही एक परदेशी भाजी आहे, जी दिसायला आपल्याकडच्या काकडी किंवा घोसावळ्यासारखी असते) वापरून तुम्ही एक क्लासी फ्लॉवर वास बनवू शकता. यासाठी झुकिनीचे उभे पातळ काप करा. आता हे काप बरणीच्या आतून गोल किंवा सरळ रेषेत लावा. वरून एखादी रिबन किंवा धागा बांधा. हा वास दिसायला खूपच क्लासी आणि मॉडर्न वाटतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार झुकिनीला चौकोनी किंवा दुसऱ्या कोणत्याही आकारात कापू शकता.
ढोबळी मिरचीपासून बनवलेला फ्लॉवर वास खूपच रंगीबेरंगी आणि आकर्षक दिसतो. हा वास बनवण्यासाठी, ढोबळी मिरचीचे गोल रिंगच्या आकारात काप करा. हे काप तुम्ही बरणीच्या आतून किंवा बाहेरून तुमच्या आवडीनुसार लावू शकता. आता त्यात फुलं ठेवून फायनल टच द्या. हा वास सगळ्यात जास्त कलरफुल आणि फेस्टिव्ह फील देतो.
भाज्यांपासून स्टायलिश फ्लॉवर वास बनवताना, भाज्या ताज्या असाव्यात याची खात्री करा. जर तुम्हाला हा वास जास्त काळ टिकवायचा असेल, तर आतमध्ये पाणी भरण्यासाठी एक वेगळा छोटा ग्लास ठेवा. भाज्यांना वास येऊ नये म्हणून रोज पाणी बदला. याशिवाय, हा वास थेट उन्हात ठेवू नका, नाहीतर भाज्या लवकर खराब होतील आणि त्यांचा रंगही फिका पडेल, ज्यामुळे संपूर्ण डेकोरेशन खराब दिसेल. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या आणि पाण्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगरचे काही थेंब टाकल्यास ताजेपणा टिकून राहतो. याशिवाय तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर भाज्या किंवा पानांचा वापर करूनही असे हटके फ्लॉवर वास बनवू शकता.