
Old Perfume Bottle Reuse Ideas: आपण सगळेच परफ्यूम किंवा डियो वापरतो, बरोबर? पण बाटली संपल्यावर तिचं काय करता? बहुतेक जण फेकून देतात. पण थांबा! आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की याच रिकाम्या बाटल्या वापरून तुम्ही कशा मस्त आणि क्रिएटिव्ह वस्तू बनवू शकता आणि घरात त्याचा उपयोग करू शकता...
रिकाम्या डियो किंवा परफ्यूमच्या बाटलीचा वापर तुम्ही एक छोटा प्लांटर म्हणून करू शकता. जर तुमच्या डियोची बाटली टिनची (पत्र्याची) असेल, तर तिला वरून कापून त्यात माती भरा आणि छोटी रोपं लावा. तुम्ही बाटलीवर पेंट करून किंवा स्टिकर लावून तिला अजून छान सजवू शकता. काचेची बाटली असेल तर ती न कापताही त्यात पाणी किंवा माती भरून छोटं फुलझाड लावता येतं.
जुन्या डियोच्या बाटलीपासून तुम्ही मुलांसाठी गोंडस बाहुला-बाहुली सुद्धा बनवू शकता. बाटलीवर रंगीबेरंगी कलर करा, त्यावर डोळे, तोंड, पगडी किंवा चष्मा असं काहीतरी काढून छान डिझाइन तयार करा. मुलांसाठी खेळायला एक मस्त बाहुली तयार होईल.
रोल-ऑन डियोच्या वरचा गोल भाग काढून टाका आणि बाटली स्वच्छ धुवून घ्या. आता तुम्ही याचा उपयोग मुलांचे पेन, पेन्सिल असं स्टेशनरी सामान ठेवण्यासाठी करू शकता.
जुन्या परफ्यूम किंवा डियोच्या बाटलीपासून तुम्ही तुमच्या टेबलसाठी एक सुंदर शो-पीस तयार करू शकता. बाटलीवर तुमच्या आवडीचे रंगीबेरंगी खडे किंवा मणी ग्लूच्या (डिंकाच्या) मदतीने चिकटवा आणि एक आकर्षक शो-पीस बनवा.
जुन्या डियो किंवा परफ्यूमच्या बाटलीचा वापर बाथरूममध्ये टूथब्रश किंवा मेकअप ब्रश ठेवण्यासाठी करता येतो. जर बाटलीचा पंप व्यवस्थित चालू असेल, तर त्यात हँड वॉश किंवा लिक्विड साबण भरून तुम्ही ती पुन्हा वापरू शकता.