शेतकऱ्यांनो तुमच्या खात्यात २००० रुपये आले का?, मोदींनी एक बटन दाबले अन् २० हजार कोटी केले वळते

Published : Jun 18, 2024, 07:47 PM ISTUpdated : Jun 18, 2024, 07:49 PM IST
pm kisan yojna 5.jpg

सार

मोदींनी बटन दाबून ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे २००० रुपये वळते केले. 

तिसऱ्यांदा पंतप्रधान पद सांभाळणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील एका कार्यक्रमातून देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता जारी केला आहे. वाराणसीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मोदींनी बटन दाबून ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे २००० रुपये वळते केले. यानुसार २० हजार कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरुवात १ फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आली होती. आतापर्यंत २००० रुपयांचे १६ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविण्यात आले आहेत. वर्षाला तीन टप्प्यांत ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. महाराष्ट्रात राज्य सरकारनेही ६००० रुपये शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे.

असा चेक करा पीएम किसान योजनेचा स्टेटस

1. पीएम किसान योजना अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

2. त्यानंतर 'Know Your Status' वर क्लिक करा.

3. नंतर नोंदणी क्रमांक भरा.

4. यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा प्रविष्ट करा.

5. सर्व माहिती भरा आणि Get Details वर क्लिक करा.

6. आता तुम्हाला स्क्रीनवर स्टेटस दिसेल.

आता जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही अधिकृत वेबसाइट pmkisan-ict@gov.in वर फार्मर्स कॉर्नरमधील हेल्प डेस्कला भेट देऊन समस्या सोडवू शकता. हेल्प डेस्कवर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाका. पुढील फॉर्म भरून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.

याशिवाय तुम्ही हेल्पलाइन नंबर 0120-6025109, 011-24300606 वर कॉल करू शकता. तुम्ही PM किसान हेल्पलाइन नंबर 155261 वर कॉल करू शकता.

आणखी वाचा :

Pik Vima News : 1 रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, अंतिम तारीख किती? कृषीमंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

मोठी बातमी! रेपो रेट घटला! पण तुमचा Home Loan EMI नेमका किती रुपयांनी कमी होणार? ही आकडेवारी तुम्हाला आनंद देईल!
स्वप्न पूर्ण करा! IndiGo मध्ये पायलट व्हायचंय? जाणून घ्या 'करोडो' रुपयांचे पॅकेज, सुविधा आणि नेमका पगार किती?