तुमच्याकडे एलपीजी गॅस सिलेंडर नाहीये किंवा संपलाय? इंडक्शन शेगडी पण नाही? काळजी करू नका. तुमच्या घरात एक इलेक्ट्रिक केटल असेल, तर तुम्ही त्यावर अनेक पदार्थ बनवू शकता. विशेषतः बॅचलर्ससाठी हे एक वरदान आहे.
आजकाल वेळेवर एलपीजी गॅस मिळत नाही, त्यामुळे अनेकांची अडचण होते. गॅस नसेल तर काही जण इंडक्शन शेगडी किंवा महागडे इलेक्ट्रिक कुकर विकत घेतात. पण एवढा खर्च करण्याची गरज नाही. तुमच्या घरात एक छोटी इलेक्ट्रिक केटल असेल तरी तुमचं काम भागेल. अनेक घरांमध्ये इलेक्ट्रिक केटल असते, पण तिचा वापर फक्त पाणी गरम करण्यासाठी केला जातो. मात्र, ही केटल एका सुपरहिरोसारखी अनेक कामांसाठी वापरता येते. चला, जाणून घेऊया या केटलमध्ये तुम्ही कोणते पदार्थ बनवू शकता.
23
1.हेल्दी ब्रेकफास्ट...
सकाळी घाईच्या वेळी नाश्ता बनवण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिक केटल वापरू शकता. केटलमध्ये पाणी उकळा आणि ते एका भांड्यात इन्स्टंट ओटमीलमध्ये घाला. तुमचा नाश्ता काही मिनिटांत तयार होईल. इतकंच नाही, तर मध्यरात्री भूक लागल्यास तुम्ही या केटलमध्ये मॅगी किंवा पास्तासुद्धा बनवू शकता. तुम्ही इलेक्ट्रिक केटलमध्ये अंडीही उकडू शकता. केटलमध्ये पाणी आणि अंडी टाकून केटल चालू करा. काही मिनिटांत अंडी उकडून तयार होतील. गॅसपेक्षा केटलमध्ये अंडी लवकर उकडतात.
33
3. गरमागरम सूप प्यावंसं वाटत असेल, तर...
तुम्हाला गरमागरम सूप प्यावंसं वाटत असेल, तर केटलमध्ये पाणी गरम करून त्यात सूप मिक्स टाका आणि झटपट सूपचा आनंद घ्या. तुम्ही या केटलमध्ये भातसुद्धा सहज शिजवू शकता. योग्य प्रमाणात तांदूळ आणि पाणी केटलमध्ये टाकून ती सुरू करा. केटलमधील स्टीम सेन्सरमुळे भात व्यवस्थित शिजतो आणि जास्त वेळ गरम राहतो. घरी पाहुणे आल्यास तुम्ही ५ ते ६ लोकांसाठी कॉफी किंवा हॉट चॉकलेटही यात बनवू शकता. एवढंच नाही, तर केटलचा वापर तुम्ही चेहऱ्यासाठी फेशियल स्टीम घेण्यासाठी किंवा लहान मुलांच्या फीडिंग बॉटल्स निर्जंतुक करण्यासाठीही करू शकता.