DIY Decor झाडांच्या तुटलेल्या फांद्या म्हणजे कचरा नाही, तर तुमच्या क्रिएटिव्हिटीसाठी एक खजिना आहे. तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून तुम्ही यापासून घरासाठी सुंदर वस्तू बनवू शकता. चला, पाहूया अशाच काही DIY क्राफ्ट आयडिया.
आजकाल लोक घर सजवण्यासाठी महागड्या वस्तू विकत घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की बागेतल्या तुटलेल्या फांद्या वापरूनही तुम्ही खूप सुंदर आणि युनिक डेकोर पीस बनवू शकता? हे DIY डेकोर तुमच्या घराला केवळ नॅचरल आणि आर्टिस्टिक लुकच देत नाही, तर ते बजेट-फ्रेंडली आणि इको-फ्रेंडलीसुद्धा आहे.
26
तुम्ही झाडांच्या फांद्या वापरून असं घुबड बनवू शकता. यासाठी एका कार्डबोर्डवर घुबडाचं मोठं चित्र काढा. मग झाडांच्या फांद्यांचे छोटे-छोटे तुकडे करा. तुम्ही झाडाची सालसुद्धा वापरू शकता. त्यानंतर, फोटोत दाखवल्याप्रमाणे डिंक लावून ते चिकटवा. डोळ्यांसाठी काळ्या रंगाची बटणं वापरा.
36
तुम्ही भिंतीवर चिकटवण्यासाठी पक्षी किंवा फुलपाखरूही बनवू शकता. यामुळे भिंतींना एक आर्टिस्टिक लुक मिळतो. यासाठीसुद्धा तुम्हाला आधी कार्डबोर्डवर पक्षी आणि फुलपाखराचं मोठं चित्र काढावं लागेल. फांद्या व्यवस्थित कापून स्वच्छ करून घ्या. मग डिंकाच्या मदतीने फोटोत दाखवल्याप्रमाणे चिकटवा.
तुमच्या बागेत जर अशी तुटलेली फांदी सापडली, तर ती फेकून देण्याऐवजी तुमची क्रिएटिव्हिटी वापरा. तुम्ही खाली एक बेस तयार करून त्यात ती फांदी फिक्स करू शकता. त्यानंतर लवचिक फांद्या जोडून एक घरटं बनवा आणि त्यावर छोटे पक्षी बसवा.
3 हजारात Giva चे स्लीक सिल्व्हर पेंडेंट चेन, कॉलेज गर्ल्ससाठी ७ डिझाइन्स
56
तुटलेल्या फांद्यांपासून बनवलेला हा DIY डेकोर पीस घराला एक नॅचरल आणि रस्टिक लुक देतो. तुम्ही फांद्या जोडून अशा प्रकारे घराचं डिझाइन बनवू शकता. हे भिंतीवर किंवा बागेत लावून तुम्ही तुमच्या जागेला एक आर्टिस्टिक टच देऊ शकता.