प्रत्येक धातूचा स्वतःचा एक विशेष ग्रह असतो. तांबे हा सूर्याचा धातू आहे. असं तांब्याचं कडं घातल्याने काही राशींच्या आयुष्यात समृद्धी आणि संपत्ती वाढते. हे घातल्याने आरोग्य सुधारतं. विशेषतः तीन राशींचं नशीब दुप्पट होणार आहे. चला तर मग पाहूया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत?
24
मेष रास
ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीसाठी तांबे शुभ आहे. या राशीचा स्वामी मंगळ असल्याने तांबे फायदेशीर ठरते. तांब्याचे कडं घातल्याने आत्मविश्वास आणि धैर्य वाढते. आरोग्य सुधारते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नशीब उजळते.
34
वृश्चिक रास
वृश्चिक रास मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. या राशीच्या लोकांनी तांब्याचं कडं घातल्यास नशीब दुप्पट होतं. करिअरमध्ये प्रगती होते. सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद मिळते.
तांबे गुरु ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे धनु राशीच्या लोकांनी हे घातल्यास सकारात्मक प्रभाव पडतो. अनेक कामांमध्ये यश मिळते. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढते आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळण्याची शक्यता असते.