मोबाईल वॉलपेपरवर मुलांचे फोटो ठेवल्याने ग्रहदोष?

मुलांचे फोटो तुम्हीही स्टेटस, वॉलपेपरला लावता का? आतापासून फोटो पोस्ट करण्यापूर्वी थोडा विचार करा. निरोगी मुलाला आजारी बनवू नका. 
 

मुलं (Children) जन्मताच पालक करणारी पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे फोटो काढणे. एवढ्यानेच काम संपत नाही, मुलांचे फोटो मोबाईल वॉलपेपर (Mobile wallpaper) वर राज्य करतात. जवळपास सर्वच पालक आपल्या मुलांचे फोटो स्टेटस (Status) ला लावतात. मुलांचे सुंदर क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपणारे पालक, स्टेटसला टाकून आनंद लुटतात. आपल्या मुलांना आप्तेष्ट, मित्रपरिवार, कुटुंबातील सदस्य पहावेत म्हणून व्हिडिओ, फोटो शेअर करतात. पण तुमच्या, तुमच्या आनंदासाठी तुम्ही मोबाईलला लावणारे मुलांचे फोटो (Photo), मुलांसाठी धोकादायक असतात हे तुम्हाला माहीत आहे का? 

मुलांचे फोटो स्टेटसला लावताच मुलांची चिडचिड, हट्ट, रडणे वाढल्याचे तुम्ही पाहिले असेल. काही जण म्हणतात, मुलांचे फोटो स्टेटसला लावताच त्यांना दृष्ट लागते. मुलांच्या वर्तनात बदल होण्याचे, आरोग्यात चढउतार होण्याचे कारण केवळ दृष्टच नाही, तर राहू दोष.

मोबाईल राहू (Rahu) शी संबंधित आहे असे मानले जाते. मुले खूप गोड असतात. चंद्र (Moon) प्रमाणे चमकत असतात. सूर्य (Sun) प्रमाणे प्रकाशमान असतात. मुलांची तुलना सूर्य-चंद्रांशी केली जाते. तुम्ही मोबाईलला मुलांचे फोटो लावताच राहू-सूर्य, राहू-चंद्राचा संगम होतो. यामुळे ग्रहण आणि अंगारक योग निर्माण होतो. मग मुले चिडचिड करायला लागतात. छोट्या छोट्या गोष्टींवर रडतात. त्यांच्या आरोग्यातही चढउतार होतात. त्यांना भूक कमी लागते. रात्री झोपेतून जागे होऊन रडायला लागतात. पालकांशी भांडण करणारी मुले, इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब करायला लागतात. 

मुलांवर नकारात्मक ऊर्जा (Negative energy) चा प्रभाव : तुम्ही स्टेटस किंवा सोशल मीडियावर मुलांचे फोटो किंवा व्हिडिओ टाकल्याने मुलांवर नकारात्मक प्रभाव पडतो. मुलांचे व्हिडिओ पाहणाऱ्यांची ऊर्जा मुलांपर्यंत पोहोचते. नकारात्मक ऊर्जा असलेले लोक मुलांचे फोटो पाहून हेवा करतात किंवा नाराज होतात. यामुळे मुलांचे आरोग्य बिघडते. खेळत असलेली मुले अचानक आजारी पडली तर त्याला दृष्टदोष म्हणता येईल. 

विराट कोहली - अनुष्का शर्मा या जोडीसह काही सेलिब्रिटी आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नाहीत असे म्हटले जाते. तुम्हीही तुमच्या मुलांचे फोटो, व्हिडिओ वारंवार टाकत असाल आणि त्यांना नकारात्मक ऊर्जेचा त्रास होत असेल तर काही उपाय करू शकता.

दृष्टदोष टाळण्यासाठी असे करा : शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन, हनुमानाच्या खांद्यावरील कुंकू आणून ते मुलांना लावा. मुलांना वारंवार दृष्ट काढावी. लाल मिरची, मोहरीचे दाणे, लसणाची साल घेऊन, मुलांना तीन प्रदक्षिणा घालून, ते अग्नीत टाकावे. घराच्या मुख्य दारावर मुलांना बसवून, थोडे पाणी त्यांच्या तोंडावर शिंपडावे. एक मूठभर मीठ आंघोळीच्या पाण्यात मिसळून, ते डोक्यापासून पायापर्यंत ओतावे. नंतर साध्या पाण्याने आंघोळ घालावी. मुलांच्या कमरेला काळा धागा बांधावा. हात किंवा मान देखील तुम्ही काळा धागा बांधू शकता. 
 

Share this article