Healthy Food : रविवार आला की नॉन-व्हेज प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं. चिकन किंवा मटण खाणं हे ठरलेलंच असतं. मांसाइतकंच लिव्हर (कलेजी) खाणारेही अनेक जण असतात. पण चिकन आणि मटण लिव्हरमध्ये आरोग्यासाठी काय जास्त चांगलं आहे, तेच आज जाणून घेऊया.
चिकन आणि मटणाचे पदार्थ अनेकांना खूप आवडतात. भरपूर जण आठवड्यातून एकदा तरी नॉन-व्हेज खाल्लंच जातं. काही जणांना विशेषतः लिव्हर (कलेजी) खायला आवडते. लिव्हर फ्राय किंवा करीच्या स्वरूपात ते नेहमी खाल्ले जाते. पण लिव्हर खरंच आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, याबाबत अनेकांच्या मनात शंका असते.
25
मटण लिव्हरमधील पोषक तत्वे -
मटण लिव्हर पोषक तत्वांच्या बाबतीत खूप पौष्टिक अन्न आहे. यामध्ये लोह, झिंक, तांबे आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळतात. ॲनिमिया असलेल्या लोकांना यामुळे आराम मिळतो. व्हिटॅमिन ए आणि बी ग्रुपची व्हिटॅमिन्स जास्त असल्याने डोळ्यांचे आरोग्य आणि त्वचेची ताकद सुधारते. व्हिटॅमिन बी12 शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
35
'या' लोकांनी मटण लिव्हर खाणे टाळावे -
मटण लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असते. ज्यांना आधीच कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, त्यांनी ते वारंवार खाणे टाळावे. गर्भवती महिलांनी ते मर्यादित प्रमाणातच खावे. श्वसनाच्या समस्या आणि दमा असलेल्या लोकांमध्ये यामुळे त्रास वाढू शकतो. हृदयविकाराचा धोका असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
45
चिकन लिव्हर खाण्याचे फायदे काय -
चिकन लिव्हरमध्ये प्रथिने, लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन बी12 भरपूर प्रमाणात असतात. सेलेनियम असल्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या काळजीसाठी उपयुक्त आहे. व्हिटॅमिन बी12 मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी उपयोगी ठरते.
55
चिकन लिव्हर कोणी खाऊ नये -
चिकन लिव्हरमध्येही कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. फॅटी लिव्हरची समस्या असलेल्यांनी ते खाणे टाळावे. हृदयविकार असलेल्या लोकांमध्ये धोका वाढण्याची शक्यता असते. किडनी आणि पचनाच्या समस्या असलेल्या लोकांनी चिकन लिव्हर खाणे टाळावे. निरोगी लोकांनीही आठवड्यातून एकदा मर्यादित प्रमाणात खाणे उत्तम आहे.