Top 5 Biggest Railway Stations in India : एका शतकाहून अधिक जुना इतिहास असलेली भारतीय रेल्वे वाहतूक व्यवस्थेत आजही आघाडीवर आहे. याला काही रेल्वे स्टेशन कारणीभूत आहेत. चला तर मग, भारतातील सर्वात मोठी 5 रेल्वे स्थानके कोणती ते जाणून घेऊयात.
भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था आहे. देशात एकूण 7500 रेल्वे स्थानके आहेत. प्रवाशांची गर्दी, ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार देशातील सर्वात मोठी स्थानके कोणती, ते जाणून घेऊयात.
26
1. हावडा जंक्शन रेल्वे स्टेशन (पश्चिम बंगाल, कोलकाता) -
पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशन भारतातील सर्वात जुने, मोठे आणि व्यस्त स्टेशन आहे. येथे 23 प्लॅटफॉर्म आणि 25 ट्रॅक आहेत. याठिकाणी दररोज 600 हून अधिक गाड्या आणि लाखो प्रवासी येथून प्रवास करतात.
36
2. सियालदह रेल्वे स्टेशन (पश्चिम बंगाल, कोलकाता) -
हे भारतातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे आणि तेही कोलकातामध्येच आहे. येथे 21 प्लॅटफॉर्म आणि 28 ट्रॅक आहेत. दररोज सुमारे 15 लाख प्रवासी येथून प्रवास करतात. यात आधुनिक सुविधांचाही समावेश आहे.
46
3. छत्रपती शिवाजी टर्मिनस (महाराष्ट्र, मुंबई) -
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. येथे 18 प्लॅटफॉर्म आणि 40 ट्रॅक आहेत. हे मध्य रेल्वेचे मुख्यालय असून देशातील सर्वात व्यस्त स्टेशनपैकी एक आहे.
56
4. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन (नवी दिल्ली) -
देशाची राजधानी नवी दिल्लीतील हे स्टेशन खूप व्यस्त असते. येथून दररोज 400 गाड्या धावतात. 1956 मध्ये बांधलेल्या या स्टेशनमध्ये 16 प्लॅटफॉर्म आणि 18 ट्रॅक आहेत. हे सर्वाधिक उत्पन्न देणारे स्टेशन आहे.
66
5. चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशन (तामिळनाडू, चेन्नई) -
हे भारतातील पाचवे आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठे स्टेशन आहे. 1873 मध्ये बांधलेल्या या स्टेशनवर 17 प्लॅटफॉर्म आहेत. दररोज 4 लाखांहून अधिक प्रवासी येथून प्रवास करतात. येथे आधुनिक सुविधा आहेत.