EPFO WhatsApp Service : पीएफ बॅलन्स तपासून पाहण्यासाठी ही सोपी पद्धत पाहा वापरुन, वाचा सविस्तर माहिती

Published : Nov 16, 2026, 07:28 PM IST
EPFO WhatsApp service launch 2026

सार

EPFO ने नवी WhatsApp सेवा सुरू केली आहे. याच्या मदतीने आता तुम्ही घरबसल्या पीएफ बॅलन्स पाहू शकता. सोबतच पासबुक डाऊनलोड आणि शेवटचे ५ व्यवहारही पाहता येतील.

मुंबई : आता एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड (EPF) मधील तुमचा बॅलन्स पाहणं खूप सोपं झालं आहे. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) आता एक नवी WhatsApp सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे तुम्हाला आता EPFO पोर्टलवर लॉगिन न करता महत्त्वाचे तपशील पाहता येतील.

या सुविधेचा वापर करून कर्मचारी आपला पीएफ बॅलन्स चेक करू शकतात. तसंच शेवटचे पाच व्यवहार पाहण्याची आणि ईपीएफ पासबुक डाऊनलोड करण्याची सुविधाही यात देण्यात आली आहे. याशिवाय 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजने'शी (PMVBRY) संबंधित माहितीही या सेवेद्वारे उपलब्ध होईल.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी EPFO च्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त या सेवेचे उद्घाटन केले. अनेक लोक आता मेसेजिंग प्लॅटफॉर्म वापरतात, त्यामुळे पीएफची माहिती अधिक सोप्या पद्धतीने पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.

EPFO चा अधिकृत WhatsApp नंबर काय आहे?

EPFO सदस्य अधिकृत WhatsApp नंबर +91 8796441800 वर मेसेज पाठवून या सेवेचा लाभ घेऊ शकतात. हा नंबर तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेव्ह करू शकता किंवा थेट WhatsApp वर सर्च करू शकता. त्यानंतर चॅटबॉटशी संपर्क साधण्यासाठी फक्त एक 'Hi' मेसेज पाठवायचा आहे. हे लक्षात ठेवा की, पडताळणीसाठी तुम्हाला युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी (UAN) लिंक असलेला मोबाईल नंबरच वापरावा लागेल.

WhatsApp द्वारे पीएफ बॅलन्स कसा तपासायचा?

नवीन सेवेचा वापर करून तुमचा ईपीएफ बॅलन्स तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  • तुमच्या फोनमध्ये +91 8796441800 हा नंबर EPFO WhatsApp Services या नावाने सेव्ह करा.
  • WhatsApp उघडा आणि सेव्ह केलेला संपर्क शोधा.
  • चॅटमध्ये जाऊन 'Hi' असा मेसेज पाठवा.
  • दिलेल्या पर्यायांमधून तुमची भाषा निवडा.
  • त्यानंतर पीएफ बॅलन्स तपासण्याचा पर्याय निवडा.
  • ओळख पटवण्यासाठी चॅटबॉटच्या सूचनांचे पालन करा.
  • जर विचारले तर ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा.
  • जर आवश्यक असेल तर संबंधित पीएफ अकाउंट निवडा आणि बॅलन्स पाहण्यासाठी सूचना पाळा.

पडताळणी पूर्ण झाल्यावर, चॅटबॉट तुम्हाला हवी असलेली माहिती देईल.

EPFO ची WhatsApp सेवा काम करत नसेल तर काय करावे?

ही सेवा नुकतीच सुरू झाली असल्याने, काही युजर्सना ओटीपी उशिरा येणे किंवा चॅटबॉट वापरताना अडचणी येणे अशा तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला काही अडचण येत असेल, तर तुम्ही वापरत असलेला नंबर तुमच्या यूएएन (UAN) शी लिंक आहे की नाही ते तपासा. जर ओटीपी आला नाही, तर काही वेळ वाट पाहा आणि पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही पुन्हा नवीन चॅट सुरू करू शकता किंवा अधिकृत EPFO पोर्टल किंवा उमंग (UMANG) ॲपद्वारे तुमच्या खात्याची माहिती घेऊ शकता.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Post Office : पोस्ट ऑफिस MIS मध्ये गुंतवणूक केली? दर महिन्याला मिळणारे व्याज खात्यात तसेच सोडू नका
Best 125cc Bikes 2026 : 66 किमी मायलेज आणि स्पोर्टी लूक; हिरो, होंडा आणि पल्सरमध्ये कोणती बेस्ट?